वैद्यकीय अधिकाऱ्याला नोटीस

By Admin | Updated: July 17, 2017 00:16 IST2017-07-16T23:42:48+5:302017-07-17T00:16:47+5:30

नाशिक : सातत्याने विविध तक्रारींमुळे चर्चेत राहणाऱ्या मनपाच्या बिटको रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फुलकर यांच्यासह दोघांना कामकाजातील सुधारणेबाबत नोटीस बजावण्यात आली

Notice to Medical Officer | वैद्यकीय अधिकाऱ्याला नोटीस

वैद्यकीय अधिकाऱ्याला नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : सातत्याने विविध तक्रारींमुळे चर्चेत राहणाऱ्या मनपाच्या बिटको रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फुलकर यांच्यासह दोघांना कामकाजातील सुधारणेबाबत नोटीस बजावण्यात आली असून, शहरी आरोग्य केंद्रातील लेटलतिफ कर्मचाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय डेकाटे यांनी दिली. नाशिकरोड येथील मनपा बिटको रुग्णालयाच्या कारभाराबाबत लोकप्रतिनिधींसह नागरिकांकडून सातत्याने तक्रारी सुरू आहेत. महासभेसह स्थायी समितीच्या सभांमध्येही त्याबाबतचे पडसाद उमटले आहेत.  नाशिकरोड प्रभाग समितीच्या सदस्यांनी काही दिवसांपूर्वीच बिटको रुग्णालयाला भेट देऊन तेथील कामकाजाबद्दल नापसंती दर्शविली होती, शिवाय वैद्यकीय अधिकारी डॉ. फुलकर यांच्याबद्दलही तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार, वैद्यकीय विभागाने डॉ. फुलकर यांना कामकाजात सुधारणा करण्यासंबंधी नोटीस बजावण्यात आल्याची माहिती डॉ. विजय डेकाटे यांनी दिली.  दरम्यान, डेकाटे यांनी शनिवारी सकाळी अचानक मनपाच्या मोरवाडी, पिंपळगाव खांब आणि वडनेर येथील शहरी आरोग्य केंद्रांना भेटी देत तपासणी केली. मोरवाडी व पिंपळगाव खांब याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचारी वर्ग वेळेत हजर असल्याचे निदर्शनास आले. मात्र, वडनेर येथील केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज सोनवणे हे हजर नसल्याचे आढळून आले. त्यांना डेकाटे यांनी दूरध्वनीवरून विचारणा केली असता त्यांनी आपण फिल्डवर असल्याचे सांगितले.  परंतु सोनवणे यांनी मूव्हमेंट रजिस्ट्ररमध्ये नोंद केली नसल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. मुख्यालयातील अधिकारी फिल्डवर असताना वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी वेळेवर कामावर हजर राहणे आवश्यक आहे अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा डॉ. डेकाटे यांनी दिला.  दरम्यान, आपण कधीही केव्हाही शहरी आरोग्य केंद्रांची तपासणी करणार असून, लेटलतिफांवर कारवाई करणार असल्याची माहिती डेकाटे यांनी दिली.

Web Title: Notice to Medical Officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.