जिल्हा बँकेकडून वसुलीसाठी जमीन जप्तीच्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:11 IST2021-07-04T04:11:31+5:302021-07-04T04:11:31+5:30

शनिवारी (दि.३) निफाड येथील बाजार समिती सभागृहात झालेल्या निफाड तालुका शेतकरी बचाव कृती समितीच्या बैठकीत आक्रमक ...

Notice of land confiscation for recovery from District Bank | जिल्हा बँकेकडून वसुलीसाठी जमीन जप्तीच्या नोटिसा

जिल्हा बँकेकडून वसुलीसाठी जमीन जप्तीच्या नोटिसा

शनिवारी (दि.३) निफाड येथील बाजार समिती सभागृहात झालेल्या निफाड तालुका शेतकरी बचाव कृती समितीच्या बैठकीत आक्रमक आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला. बैठकीला निफाड तालुक्यातील विविध कार्यकारी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी निफाड तालुका शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय किसान करणी सेनेचे अध्यक्ष मधुकर ढोमसे हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी ढोमसे यांनी सांगितले, जिल्हा बँकेने कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या जमीन जप्तीचा घाट घातला आहे. याविरोधात शेतकरी कृती समिती आक्रमक भूमिका घेत हायकोर्टात रिट याचिका दाखल करणार असून याविरोधात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जिल्हा बँकेच्या अन्यायकारी भूमिकेची माहिती देत चालू अधिवेशनात हा प्रश्न मांडण्याची आग्रही विनंती करणार आहे. जिल्हा बँकेने आपल्या भूमिकेत बदल केला नाही तर आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी पंचायत समितीचे सदस्य शिवा सुराशे अश्फाक शेख ,जगन कुटे, वाल्मीक सांगळे संपत डुंबरे, निवृत्ती कोडले आदींनी आपली भूमिका मांडली.

यावेळी रयत क्रांती शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवनाथ जाधव, दत्ता सुडके, प्रभाकर मापारी ,केशव जाधव ,संजय वाबळे ,रामकृष्ण दराडे, अब्दुल शेख, विलास मंडलिक , रामभाऊ बोरगुडे ,नवनाथ बोरगुडे , वसंत गुजर ,बाबासाहेब गुजर, उमाकांत शिंदे, कैलास पानगव्हाणे ,जयवंत मापारी ,सदाशिव बोरगुडे , रमेश शिंदे, दीपक बनकर आदींसह शेतकरी बचाव कृती समितीचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

Web Title: Notice of land confiscation for recovery from District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.