इंदिरानगरला अतिक्रमण धारकांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:11 IST2021-06-27T04:11:42+5:302021-06-27T04:11:42+5:30

सावरकर चौक ते पेठे नगर कॉर्नर जुना रस्ता म्हणून ओळखला जातो. या रस्त्यालगत सप्तशृंगी सोसायटी, गुरुकृपा सोसायटी, जिल्हा परिषद ...

Notice to encroachment holders at Indiranagar | इंदिरानगरला अतिक्रमण धारकांना नोटिसा

इंदिरानगरला अतिक्रमण धारकांना नोटिसा

सावरकर चौक ते पेठे नगर कॉर्नर जुना रस्ता म्हणून ओळखला जातो. या रस्त्यालगत सप्तशृंगी सोसायटी, गुरुकृपा सोसायटी, जिल्हा परिषद कॉलनी,महारुद्र कॉलनी, आयटीया सोसायटी, जाखडीनगरसह विविध अपार्टमेंट व सोसायटी आहेत. त्यामुळे आणि परिसरातील नागरिकांना शहरात ये-जा करण्यासाठी सावरकर चौक ते पेठे नगर कॉर्नर या रस्त्याचा वापर करतात. सदरचा रस्ता वाहतुकीसाठी अरुंद पडत असल्याने वाहतुकीस अडचण निर्माण होत असे. नागरिकांनी रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरणाची मागणी केली होती. त्यानुसार रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी १८ मीटर रस्त्याचे मोजमाप नगररचना विभागाकडून करण्यात येऊन सावरकर चौक ते पेठेनगर कॉर्नर रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या आठ मिळकतधारकांनी अतिक्रमण केल्यामुळे त्यांना मार्किंग करून नोटीस देण्यात आली असून, सदर अतिक्रमण दहा दिवसात स्वतःहून काढून घ्यावे अन्यथा अतिक्रमण विभागाच्या वतीने कारवाई करण्यात येणार असल्याचे नोटिसीत म्हटले आहे.

Attachments area

Web Title: Notice to encroachment holders at Indiranagar