बाजार समित्यांना बरखास्तीच्या नोटिसा?

By Admin | Updated: August 9, 2016 23:03 IST2016-08-09T22:59:37+5:302016-08-09T23:03:21+5:30

बाजार समित्यांना बरखास्तीच्या नोटिसा?

Notice of dismissal of market committees? | बाजार समित्यांना बरखास्तीच्या नोटिसा?

बाजार समित्यांना बरखास्तीच्या नोटिसा?

गणेश धुरी ल्ल नाशिक
कांदा लिलावप्रश्नी व्यापाऱ्यांच्या कांदा लिलाव गोणीच्या आग्रहामुळे गेल्या सव्वा महिन्यापासून कांदा व बटाट्याचे लिलाव ठप्प झाल्याप्रकरणी सहकार खात्याने आक्रमक भूमिका घेऊन जिल्ह्णातील १४ बाजार समित्यांना बाजार समिती नियमनमुक्ती कायदा कलम ४५ अन्वये बाजार समितीला बरखास्त का करण्यात येऊ नये? अशा नोटिसा बजावण्याची कार्यवाही सुरू केल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, मंगळवारी दुपारी पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्यासोबत असलेल्या बाजार समिती नियमनमुक्त समितीच्या बैठकीत कोणताही निर्णय न झाल्याने कांदा लिलावाचा प्रश्न कायम राहिला. कांदा लिलावसंदर्भात तसेच बाजार समिती नियमन कायदा दुरुस्तीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे पणनमंत्र्यांनी सांगितल्याचे नाशिक बाजार समितीचे सभापती माजी खासदार देवीदास पिंगळे यांनी सांगितले. चौदाही बाजार समित्यांमध्ये कांदा लिलावावरून निर्माण झालेली परिस्थिती व त्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी पाहता सहकार खात्याने व्यापाऱ्यांसह बाजार समित्यांविरोधात आक्रमक भूमिका घेण्याची कार्यवाही सुरू केल्याचे कळते. याच अनुषंगाने शेतकऱ्यांनी आणलेला शेतमाल विक्री न करता शेतकऱ्यांची गैरसोय तसेच बाजार समिती कायदा कलमानुसार कामकाज न केल्याचा ठपका ठेवत जिल्ह्णातील सर्व १४ कृषी उत्पन्न बाजार समित्यांना बाजार समिती बरखास्त का करण्यात येऊ नये? यासंदर्भातील कारणे दाखवा नोटीस बजावण्याची कार्यवाही मंगळवारी रात्री उशिरा सहकार खात्याने सुरू केल्याचे वृत्त आहे. बाजार समित्यांना कारणे दाखवा नोटीस बाजार समिती नियमन कायदा ४५ अन्वये देण्यात येणार असून, त्यासंदर्भात बाजार समित्यांकडून खुलास प्राप्त होताच त्यानंतर बाजार समित्यांच्या बरखास्तीचा निर्णय शासन पातळीवरून होण्याची शक्यता आहे. लासलगाव बाजार समितीतील कांदा लिलावावरून उडालेली धुमश्चक्री पाहता सरकारने शेतकऱ्यांच्या भावना समजून घेऊन बाजार समित्यांवरच आता कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी केल्याचे कळते. त्याचाच एक भाग म्हणून बाजार समित्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची कार्यवाही सुरू झाल्याचे समजते. कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या वृत्ताला सहकार खात्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा तिढा सोडविण्यासाठी तसेच कांदा लिलावप्रश्नी तोडगा काढण्यासाठी राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख तातडीने दिल्लीला रवाना होणार असल्याची चर्चा सहकार क्षेत्रात रात्री उशिरा होती. दिल्लीला वाणिज्य मंत्र्यांना भेटून ते तोडगा काढणार असल्याचे समजते.

Web Title: Notice of dismissal of market committees?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.