शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

माझे फेसबुकवर अकाउंटसुद्धा नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 01:32 IST

सोशल मीडियाचा फटका केवळ सर्वसामान्यांना बसतो असे नाही, तर चक्क आयपीएस अधिकारी नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनाही त्याला सामोरे जावे लागत आहे.

नाशिक : सोशल मीडियाचा फटका केवळ सर्वसामान्यांना बसतो असे नाही, तर चक्क आयपीएस अधिकारी नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनाही त्याला सामोरे जावे लागत आहे. फेसबुकवर त्यांच्या नावाने बनावट पेजेस तयार करून हजारो लाइकस् मिळविणाऱ्यांमुळे नांगरे-पाटील जेरीस आले आहे. नाशिकमध्ये आल्यापासून सायबर टीमला त्यांनी सूचना करून अद्याप असे १९ बनावट फेसबुक पेजेस त्यांनी डिलिट केले आहेत. फेसबुकवर माझ्या नावाचे अकाउंटदेखील नसल्याचा जाहीर खुलासा नांगरे-पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला.तरुणांचे आयडॉल व आपल्या खास वक्तृत्व शैलीने तरुणाईची मने जिंकणारे विश्वास नांगरे पाटील यांचे फेसबुकवर स्वत:चे अकाउंट नसल्याचा धक्कादायक खुलासा दस्तुरखुद्द त्यांनी पत्रकार परिषदेतच केला. त्यांच्या नावाने फिरणाºया पोस्ट््स, व्हिडिओ हे बनावट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फेसबुकवर केवळ विश्वास नांगरे पाटील असे नाव जरी सर्च केले तरी आठ ते दहा पेजेस आणि ग्रुप दिसतात. त्यांच्या नावाने असलेले एक फेसबुक अकाउंट सहज तपासले असता त्यावर चक्क ६५ हजार ४२७ लोक त्यांना फॉलो करताना लक्षात आले. काही पेजेसला तर हजारोंच्या संख्येने लोक जोडलेले आहेत. काही दोन ते तीन फेसबुक पेजवर मात्र ‘हे पेज विश्वास सर चालवित नसून हे त्यांच्या चाहत्यांसाठी तयार करण्यात आले आहे’ अशी स्पष्ट सूचनाही वाचण्यास मिळते. त्यांच्या नावाने असलेल्या फेसबुक पेजवर किंवा अकाउंटवर भेट दिल्यास त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांसोबतचे छायाचित्रही सहजरीत्या झळकलेले पहावयास मिळतात.प्रत्यक्षात असे असले तरी स्वत: विश्वास नांगरे पाटील यांनी याबाबत ‘माझा फेसबुकशी कुठलाही संबंध नाही’ असे जाहीरपणे पत्रकारांसमोर सांगितले. यावरून त्यांच्या नावाने सोशल मीडियावर विशेषत: फेसबुकवर सुरू असलेली चर्चा ही ‘फेक’ असल्याचे स्पष्ट होते. त्यांच्या नावाने चालविल्या जाणाºया पोस्टदेखील त्यांच्या नसतात हेदेखील यावरून अधोरेखित होते. ‘अनेकदा माझी मुलगी मला सांगते, की पप्पा, तुमच्या नावाने फेसबुकवर पोस्ट आली आहे’ असे नांगरे-पाटील यांनी यावेळी सांगितले.‘यू-ट्यूब’वरीलही काही चित्रफिती केल्या डिलिटयू-ट्यूबवरदेखील काही चाहत्यांनी माझ्या भाषणाचे व्हिडिओ क्लिप्स् अपलोड केल्या आहेत; मात्र त्यापैकी बहुतांश क्लिप्स मी स्वत: सायबर टिमला डिलिट करण्याच्या सूचना केल्या आहेत. यू-ट्यूबवरदेखील माझे वैयक्तिक असे कुठलेही चॅनलवगैरे नसल्याचा खुलासा नांगरे पाटील यांनी केला.

टॅग्स :Vishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटीलnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयFacebookफेसबुक