...नाही सहन होत या व्यथा ! सोशल मिडियावर रंगला संप

By Admin | Updated: June 1, 2017 21:27 IST2017-06-01T21:27:04+5:302017-06-01T21:27:04+5:30

काळ्या आईच्या उदरात पेरलय बान-बियान अन् निसर्गाकडे लागलयं बाच मन.. पावसाचं करतोय ध्यान आता सारी कोरडीच माती नाही दिसत बियांचं मोड नाही दिसत हिरवं शिवार शेत पडलं ओसाड..

... not being able to bear this sorrow! There is a red corner on social media | ...नाही सहन होत या व्यथा ! सोशल मिडियावर रंगला संप

...नाही सहन होत या व्यथा ! सोशल मिडियावर रंगला संप

नाशिक : ‘काळ्या आईच्या उदरात पेरलय बान-बियान अन् निसर्गाकडे लागलयं बाच मन.. पावसाचं करतोय ध्यान आता सारी कोरडीच माती नाही दिसत बियांचं मोड नाही दिसत हिरवं शिवार शेत पडलं ओसाड...किती सांगू शेतकरी बाबाच्या कथा नाही सहन होत या व्यथा...’ अशा एक ना अनेक प्रकारच्या कविता, शायरी, शेतकऱ्यांच्या छायाचित्रांच्या माध्यमातून गुरूवारी दिवसभर सोशल मिडिया गहिवरला.
देशाच्या अन् राज्याच्या इतिहासात प्रथमच बळीराजाने संप पुकारल्यामुळे शहरवासीयांचे हाल झाले आणि सरकारी यंत्रणाही हादरून गेली. या संपाबाबत अनेकांनी आपली मते सोशल मिडियावर मुक्तपणे मांडली. काहींनी शेतकऱ्यांचा संप गरजेचा होता, सरकारने अंत बघितला अन् संयमांचा बांध अखेर फुटला अशा प्रतिक्रिया नोंदविल्या तर काहींनी मात्र शेतकऱ्यांनी संप केला यास हरकत नाही मात्र शेतमालाची केलेली नासाडी बघवत नसल्याचेही अधोरेखित केले.

 

 

गुरूवारी मध्यरात्रीपासून सोशल मिडियावर नेटीझन्स सक्रिय झाले होते. दिवसभर नेटीझन्सनी शहरासह जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या संपाबाबतच्या बातम्या, छायाचित्रे, चित्रफित सोशल मिडियावर पोस्ट केले. अनेकांनी बळीराजाचे व जनतेचे आभारही मानले.

Web Title: ... not being able to bear this sorrow! There is a red corner on social media