सटाणा : ग्रामीण रु ग्णालयातील परिचारिकेला डॉक्टरने अरेरावी करून धक्काबुक्की केल्याच्या निषेधार्थ सटाणा ग्रामीण रुग्णालयाच्या परिचारिकांनी शुक्रवारी रुग्णांच्या तपासणी वेळीच कामबंद आंदोलन सुरु केले. सबंधित डॉक्टरवर कारवाई होत नाही तोपर्यंत काम सुरु करणार नाही, असा पावित्रा परिचारिकांनी घेतला होता.वैद्यकीय अधीक्षकांनी आंदोलनाची दखल न घेतल्याने थेट नगराध्यक्ष मोरे यांना फोन करून घडलेला प्रकार कथन केला. नगराध्यक्ष मोरे यांनी सटाणा ग्रामीण रु ग्णालयात धाव घेवून घडलेला प्रकार जाणून घेत आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांशी संपर्कसाधून चर्चा केली. दोन दिवसांत वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी यांची बैठक आयोजित करून संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्याचे आश्वासन वरिष्ठ वैद्यकीय अधिकाºयांनी परिचारिकांना दिल्यान कामकाज सुरळीत झाले.
सटाण्यात परिचारिकांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:04 IST