भाज्या महागल्याने सर्वसामान्य हवालदिल
By Admin | Updated: July 17, 2017 00:22 IST2017-07-17T00:22:10+5:302017-07-17T00:22:34+5:30
नाशिक : पावसाअभावी भाज्यांची कमी झालेली आवक, आहे त्या भाज्यांचे चढे दर, जीएसटीच्या गोंधळामुळे महागाईचा गोंधळ यामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीस आले

भाज्या महागल्याने सर्वसामान्य हवालदिल
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : पावसाअभावी भाज्यांची कमी झालेली आवक, आहे त्या भाज्यांचे चढे दर, जीएसटीच्या गोंधळामुळे महागाईचा गोंधळ यामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीस आले असून, किमान परवडतील अशा दरात भाज्या कधी मिळतील याची प्रतीक्षा आता सर्वांना लागून राहिली आहे. भाज्यांच्या भावात दुपटी-तिपटीने वाढ झाल्याचे दिसते आहे. भाजीविक्रेते आणि सर्वसामान्य ग्राहक यांना भाववाढीचा सामना करावा लागत असून, भाव कमी झाले नाही तर परिस्थिती बिकट होण्याची चिन्हे आहेत.
सर्वच भाज्या महाग
पूर्वीचे दर आताचे दर
वांगे-४० ते ५०७० ते ८०
गवार- ५० ते ६०८० ते ९०
भेंडी- ३० ते ४०६० ते ७०
पालक- १० ते १२१५ ते २०
मेथी- ५ ते १०२५ ते ३०
शेपू- १० ते १५१५ ते ३०
कोबी प्रति नग - १५ ते २० २० ते २५
फ्लॉवर प्रति नग - १५ ते २० २० ते २५
डांगर- १५ ते २० ४० ते ५०
सिमला- २० ते ३०६० ते ७०
वाल- ३० ते ४०६० ते ७०
दुधीभोपळा- १० ते १२ २०
गिलके- ५० ते ६०८० ते ९०
दोडके- ५० ते ६०८० ते ९०
कारले- ४० ते ५० ६० ते ७०
टमाटे- ४० ते ५०६० ते ७०
हिरवी मिरची- ५० ते ६० ६० ते ७०
बटाटे- १० ते १५२५ ते ३०