आठ ग्रामपंचायतींच्या आठ जागांची पोटनिवडणूक बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 12:42 AM2019-11-28T00:42:27+5:302019-11-28T00:43:07+5:30

सिन्नर : तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या आठ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सर्वच ठिकाणी प्रत्येकी एक सदस्याची बिनविरोध निवड झाली. बहुतेक ठिकाणी प्रत्येकी एक अर्ज प्राप्त झाला होता; मात्र निवड बिनविरोध झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

Non-election of eight Gram Panchayats to eight seats | आठ ग्रामपंचायतींच्या आठ जागांची पोटनिवडणूक बिनविरोध

आठ ग्रामपंचायतींच्या आठ जागांची पोटनिवडणूक बिनविरोध

Next
ठळक मुद्देसिन्नर : पाथरे खुर्द येथे वैशाली जाधव, तर दोडीत माळी यांची वर्णी

लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या आठ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सर्वच ठिकाणी प्रत्येकी एक सदस्याची बिनविरोध निवड झाली. बहुतेक ठिकाणी प्रत्येकी एक अर्ज प्राप्त झाला होता; मात्र निवड बिनविरोध झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
पाथरे खुर्द ग्रामंपचायतीत प्रभाग क्र. दोनच्या सर्वसाधारण स्री जागेवर वैशाली एकनाथ जाधव, फुलेनगर ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक तीनमधील सर्वसाधारण जागेवर रामदास भास्कर गाडेकर, पिंपरवाडी ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक दोनमधील सर्वसाधारण जागेवर प्रवीण श्यामराव गायकवाड, सोमठाणे येथील प्रभाग क्रमांक तीनमधील अनुसूचित जाती स्री राखीव जागेवर सरला राजेंद्र साळवे, लोणारवाडी येथील प्रभाग क्रमांक एकमधील सर्वसाधारण जागेवर राजेंद्र बाजीराव भगत, पंचाळे येथील प्रभाग क्रमांक चारमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या जागेवर सूरज सुरेश तुपे, खोपडी बुद्रुक येथील प्रभाग क्रमांक तीनमधील नागरिकांचा मागास प्रवर्ग स्री जागेवर कावेरी गणेश गुरुळे, तर दोडी बुद्रुक येथील प्रभाग क्रमांक एकमधील अनुसूचित जमातीच्या जागेवर सोमनाथ पांडुरंग माळी यांची बिनविरोध निवड झाली. आठही गावांमध्ये सामंजस्यया सर्व ठिकाणची निवडणूक बिनविरोध झाली असून, त्यांची अधिकृत घोषणा ८ डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे. यातील बहुतेक ग्रामपंचायतींची मुदत जून २०२० मध्ये संपत असून, केवळ ६ ते ७ महिन्यांचा कालावधी सदस्यांना मिळणार असल्याने पोटनिवडणुकीत चुरस दिसली नाही. निवडणुका बिनविरोध झाल्याने शासनाचाही खर्च वाचला. शिवाय आठही गावांतील वातावरण सामंजस्यांचे राहिले आहे. नागरिकांनी आनंद व्यक्त केला.

Web Title: Non-election of eight Gram Panchayats to eight seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.