वर्षा लहाडे यांचे तपासात असहकार्य
By Admin | Updated: May 13, 2017 01:24 IST2017-05-13T01:21:31+5:302017-05-13T01:24:58+5:30
नाशिक :गर्भपात प्रकरणातील डॉ़ वर्षा लहाडे या तपासात सहकार्य करीत नसल्याची तक्रार पोलिसांनी (दि़१२) न्यायालयात केली़

वर्षा लहाडे यांचे तपासात असहकार्य
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्हा रुग्णालयातील बेकायदेशीर गर्भपात प्रकरणातील संशयित स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ़ वर्षा लहाडे या तपासात सहकार्य करीत नसल्याची तक्रार म्हसरूळ पोलिसांनी शुक्रवारी (दि़१२) न्यायालयात केली़ पोलिसांच्या तक्रारीनंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आरती शिंदे यांनी लहाडे यांच्या पोलीस कोठडीत एक दिवसांची वाढ केली़ डॉ. वर्षा लहाडेविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात एमटीपी कायद्यानुसार तर म्हसरूळ पोलीस स्टेशनमध्ये विनापरवानगी दवाखाना सुरू करणे, गर्भपाताची औषधे व सोनोग्राफी मशीन ठेवणे याबाबत गुन्हा दाखल आहे. सरकारवाडा पोलिसांनी लहाडेकडे चौकशी केल्यानंतर न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली़ यानंतर ९ मे रोजी म्हसरूळ पोलिसांनी ताबा घेतला़ न्यायालयाने त्यांना प्रथम तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली होती़ पोलीस कोठडीची मुदत संपल्याने लहाडे यांना न्यायालयात हजर केले असता तपासात सहकार्य करीत नसल्याची तक्रार केल्यानंतर एक दिवसाची पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली़ दरम्यान, पोलिसांसमोर डॉ़लहाडे यांच्याशी संपर्क असलेले डॉक्टर, भूलतज्ज्ञ, गर्भपाताची औषधे, त्यांचा वापर, गायब करण्यात आलेले सोनोग्राफी मशीनचा शोध घेण्याचे आव्हान आहे़