महामंडळांवर सनदी अधिकारी नेमा
By Admin | Updated: August 7, 2015 22:56 IST2015-08-07T22:55:36+5:302015-08-07T22:56:54+5:30
ढोबळे : गैरप्रकाराची चौकशी योग्य दिशेने

महामंडळांवर सनदी अधिकारी नेमा
नाशिक : कोणत्याही महामंडळात चालणाऱ्या गैरकारभारावर अंकुश लावायचा असेल तर त्या महामंडळांचा प्रमुख अधिकारी हा सनदी अधिकारी असावा, असे मत माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी व्यक्त केले.
बहुजन रयत परिषदेच्या वतीने आयोजित समाजप्रबोधन अभियानासाठी नाशिकमध्ये आले असता ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी अनुसूचित जातीच्या एकूण लोकसंख्येपैकी मातंग, चर्मकार, होलार या समाजघटकांसाठी अ, ब, क, ड या पद्धतीने आरक्षण पद्धत लागू करण्याची मागणी केली. आजही समाजातील मोठा भाग आरक्षणाअभावी उपेक्षित आणि मागास असून, त्यांना त्याचा लाभ मिळावा, अशी मागणीही त्यांनी केली.
साठे महामंडळात झालेल्या गैरकारभारावर काही बोलणे योग्य ठरणार नाही, कारण मुख्यमंत्र्यांनी त्यात स्वत: लक्ष घातले असून, याप्रकरणी सुरू असलेली चौकशी योग्य दिशेने असल्याचे सांगत यापुढे असे प्रकार टाळण्यासाठी महामंडळांवरील अधिकारी सनदी अधिकारी असतील याची दक्षता घेण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.