शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मनपा हद्दीत नाही जागेचा ‘भरोसा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 00:16 IST

महिलांवरील अन्याय, अत्याचाराची तातडीने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या भरोसा प्रकल्पाला नाशिक शहरात मात्र जागा मिळत नसून अनेक जागा बदलूनही त्यावर कार्यवाही होत नसल्याने महापालिकेवर कसा भरवसा ठेवायचा असा प्रश्न आमदार देवयांनी फरांदे यांनी केला आहे.

नाशिक : महिलांवरील अन्याय, अत्याचाराची तातडीने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या भरोसा प्रकल्पाला नाशिक शहरात मात्र जागा मिळत नसून अनेक जागा बदलूनही त्यावर कार्यवाही होत नसल्याने महापालिकेवर कसा भरवसा ठेवायचा असा प्रश्न आमदार देवयांनी फरांदे यांनी केला आहे.  महिलांवर घराबाहेर होणारी छेडखानी आणि होणारे हल्ले नवीन नाही. त्याचबरोबर अनेकदा घरातही महिलांवर अत्याचार होत असतात. महिलांवर अशाप्रकारचे अत्याचार होत असताना त्यांच्या तक्रारींची तत्काळ दखल घ्यावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आणि न्याययंत्रणेसह तब्बल अकरा शासकीय यंत्रणा एकत्र आणून नागपूरमध्ये भरोसा हा प्रकल्प राबविला असून, महिलांवरील अत्याचाराबाबत चोवीस तासांत दखल घेऊन कार्यवाही करण्यात येत असल्याने महिलांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. त्यासंदर्भात गेल्या डिसेंबर महिन्यात राज्यातील महिला आमदारांसाठी एक कार्यशाळा घेण्यात आली. त्यांना या प्रकल्पाचे कामकाज दाखविल्यानंतर आपापल्या मतदारसंघात अशाच प्रकारचा प्रकल्प राबवावा अशाप्रकारची सूचना फडणवीस यांनी केली, त्यानुसार आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिकमध्ये कार्यशाळा घेतली. नाशिकचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल या कार्यशाळेस उपस्थित होते. त्यांना आणि न्यायाधीशांनादेखील कल्पना रुचली.गेल्या डिसेंबर महिन्यात आमदार देवयानी फरांदे यांनी महापालिकेला पत्र देऊन या प्रकल्पासाठी भालेकर हायस्कूलमध्ये जागा मागितली होती. त्याचा मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करण्यात आला आणि ही जागा महापालिकेने नाकारली. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना या जागेवर सेंट्रल लायब्ररी करण्याची तयारी केल्याचे सांगण्यात आले. आमदार फरांदे यांनी या केंद्रासाठी हुंडीवाला लेन येथील मनपा शाळेची इमारत मागितली; परंतु तीदेखील अद्याप मिळालेली नसून हा प्रकल्प रखडलेला आहे.‘भरोसा’ प्रकल्पासाठी जागा मिळावी यासाठी मी दोन जागा सुचविल्या. त्यापैकी भालेकर शाळेतील वर्ग मिळू शकले नाही, त्यामुळे दुसरी जागा सुचविण्यात आली. हुंडीवाला लेन येथील जागा आठ महिन्यांपासून मिळू शकलेली नाही. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेला अधिकृत पत्र देऊनही जागा न मिळाल्याने प्रकल्प उभा राहू शकला नाही.- आमदार देवयानी फरांदे

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMLAआमदार