शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये खासगी रूग्णालयांना परवानगी,मात्र लसच उपलब्ध नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 15:52 IST

नाशिक- महापालिकेने शहरातील २१ खासगी रूग्णालयांना त्यांच्या मागणी नुसार लसीकरणासाठी परवानगी दिली खरी मात्र, बाजारात लसच उपलब्ध नसल्याने त्याचा गेांधळ असून लस केाव्हा मिळणार असा प्रश्न आहे. 

ठळक मुद्देमहापालिकेचा निर्णय लसींची शोधाशोध कायम

नाशिकमहापालिकेने शहरातील २१ खासगी रूग्णालयांना त्यांच्या मागणी नुसार लसीकरणासाठी परवानगी दिली खरी मात्र, बाजारात लसच उपलब्ध नसल्याने त्याचा गेांधळ असून लस केाव्हा मिळणार असा प्रश्न आहे. 

शासनाकडून सुरूवातील शासकीय, निमशासकीय आणखी खासगी रूग्णालयात लस उपलब्ध करून दिल्या आहेत. महापालिका आणि अन्य शासकीय रूग्णालयात मोफत डोस दिले जात असले तरी खासगी रूग्णालयात अडीचशे रूपयांना एक डोस या दराने डोस दिले जात होते. मात्र नंतर शासनाने खासगी रूग्णालयातील लसीकरण पूर्णत: बंद केले असून केवळ शासकीय रूग्णालय आणि महापालिकेच्या रूग्णालयातील लस दिली जात आहे. अशा स्थितीत महापालिकेकडे खासगी रूग्णालयांनी लसीकरणाची परवानगी मागितली त्यानुसार नाशिक महापालिकेने नाशिक पूर्व विभागात रेडीयन्ट प्लस हॉस्पीटल, साई सिध्दी हॉस्पीटल आणि सुविचार हॉस्पीटल अशा तीन ठिकाणी तर सिडकोत मयुर हॉस्पीटल, सायखेडकर हॉस्पीटल आणि सुश्रूषा क्लीनीक याठिकाणी लसीकरणासाठी परवानगी दिली आहे. पश्चीम विभागात प्रसन्न बाल रूग्णालय, मॅग्नम हॉस्पीटल, गंगा ऋषीकेश हॉस्पीटल, साफल्य रेनबेा हॉस्पीटल, नव संजीवनी हॉस्पीटल, निम्स हॉस्पीटल, मानवता कॅन्सर हॉस्पीटल,चिरंजीव हॉस्पीटल, कृष्णा मॅटर्निटी हेाम, बिर्ला आय हॉस्पीटल, अरीहंत हॉस्पीटल, अंतरा हॉस्पीटल, तुळशी हॉस्पीटल तसेच सप्तशृंगी नेत्र सेवा या रूग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी दिली आहे. मात्र, अशा प्रकारची परवानगी देताना लस उपलब्धतेबाबत महापालिका जबाबदार राहाणार नाही असे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बापुसाहेब नागरगोजे यांनी नमूद केले आहे. 

मुळात महापालिकेला लस उपलब्ध होत नाही राज्य शासनाची देखील तीच अडचण आहे. अशावेळी खासगी क्षेत्राला लस कशी मिळणार असा प्रश्न आहे. महापालिकेने परवानगी दिली असली तरी प्रत्यक्षात लस कधी उपलब्ध होईल, त्याचे दर किती असतील याची केाणतीही माहिती महापालिकेकडे उपलब्ध नाही. 

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाCorona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटल