शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

संभाजीनगर नामकरणास विरोध नाही: रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 01:27 IST

औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यास आमचा विरोध नाही; मात्र सध्या नामकरणाची आवश्यकता नाही. केवळ निवडणुका  असल्याने नामांतराच्या मुद्द्यावर राजकारण होत असल्याची टीका केंद्रीय मंत्री तथा आरपीआय नेते रामदास आठवले यांनी केली आहे. यापूर्वी शिवसेना सत्तेत असताना नामकरण  का केले नाही, असा सवाल करतानाच आता शिवसेनेने नामकरणाचा आग्रह केला तर काँग्रेस त्यांना सोडून जाईल, असे भाकीतही त्यांनी यावेळी केले. 

ठळक मुद्दे मतभेदामुळे सरकार पडण्याचे केले भाकीत

नाशिक : औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यास आमचा विरोध नाही; मात्र सध्या नामकरणाची आवश्यकता नाही. केवळ निवडणुका  असल्याने नामांतराच्या मुद्द्यावर राजकारण होत असल्याची टीका केंद्रीय मंत्री तथा आरपीआय नेते रामदास आठवले यांनी केली आहे. यापूर्वी शिवसेना सत्तेत असताना नामकरण  का केले नाही, असा सवाल करतानाच आता शिवसेनेने नामकरणाचा आग्रह केला तर काँग्रेस त्यांना सोडून जाईल, असे भाकीतही त्यांनी यावेळी केले. नाशिकमधील शासकीय विश्रामगृहात रामदास आठवले यांनी शुक्रवारी (दि. ८) पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधला. ते म्हणाले, छत्रपती संभाजी राजे यांच्या नावाला आमचा विरोध नाही; मात्र तेथील  विमानतळ‌ाला अजिंठा-वेरूळ असे नाव द्यावे, अशी मागणी करतानाच नामंतराच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि शिवसेनेतील ताणलेल्या संबंधाकडेही त्यांनी लक्ष वेधत राज्यातील सरकार आपसातील मतभेदांमुळे कोसळून पुन्हा देवेंद्र फडणवीस यांचे सरकार येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, देशभरातील कोरोना स्थितीवर बोलताना कोरोनामुळे आर्थिक स्थिती खालावल्याचे मान्य करतानाच लसीकरणाचा खर्च करावा असे मत त्यांनी व्यक्त केले. निवडणुका भाजपसोबतचराज्यभरात होऊ घातलेल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आरपीआय आणि भाजप एकत्र लढविणार असून नाशिकमध्येही भाजपसोबच राहणार असय्याचे रामदास आठवले यांनी स्पष्ट केेले. मात्र त्यासाठी आम्हाला आमच्या ताकदीप्रमाणे सन्मानजनक जागा मिळाव्यात अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. मराठा आरक्षणात सरकार अपयशी मराठा आरक्षण प्रकरणात उद्धव ठाकरे यांचे सरकार न्यायालयात भक्कम बाजू मांडण्यात अपयशी ठरल्याची टीका रामदास आठवले यांनी केली आहे. त्याचप्रमाणे हे प्रकरण न्यायालयात असल्याने केंद्र सरकारला हस्तक्षेप करता येत नसल्याचे नमूद करीत राष्ट्रीय स्तरावर आम्हाला सर्वांगीण विचार करून निर्णय घ्यावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र मराठा समाजाला समाजाच्या मागणीनुसार ओबीसीतून नव्हे तर वेगळे आरक्षण द्यावे अशीच आमची भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  ट्रम्प यांच्याशी संवाद साधणारनाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना रामदास आठवले यांनी विविध विषयांना स्पर्श करतानाच अमेरिकेतील सत्तासंघर्षावरही भाष्य करताना अमेरिकन संसदेत ट्रम्प समर्थकांनी घातलेला गोंधळ योग्य नसल्याची टीका करतानाच हा लोकशाहीचा आणि रिपब्लिकन पक्षाचा अपमान असल्याचे मत व्यक्त केले. ट्रम्प यांनीही पराभव मान्य करावा असे आवाहन करतानाच या विषयावर ट्रम्प यांच्याशी फोनवर चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकRamdas Athawaleरामदास आठवलेAurangabadऔरंगाबाद