संभाजीनगर नामकरणास विरोध नाही: रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 01:26 AM2021-01-09T01:26:23+5:302021-01-09T01:27:37+5:30

औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यास आमचा विरोध नाही; मात्र सध्या नामकरणाची आवश्यकता नाही. केवळ निवडणुका  असल्याने नामांतराच्या मुद्द्यावर राजकारण होत असल्याची टीका केंद्रीय मंत्री तथा आरपीआय नेते रामदास आठवले यांनी केली आहे. यापूर्वी शिवसेना सत्तेत असताना नामकरण  का केले नाही, असा सवाल करतानाच आता शिवसेनेने नामकरणाचा आग्रह केला तर काँग्रेस त्यांना सोडून जाईल, असे भाकीतही त्यांनी यावेळी केले. 

No objection to naming Sambhajinagar: Ramdas Athavale | संभाजीनगर नामकरणास विरोध नाही: रामदास आठवले

संभाजीनगर नामकरणास विरोध नाही: रामदास आठवले

Next
ठळक मुद्दे मतभेदामुळे सरकार पडण्याचे केले भाकीत

नाशिक : औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यास आमचा विरोध नाही; मात्र सध्या नामकरणाची आवश्यकता नाही. केवळ निवडणुका  असल्याने नामांतराच्या मुद्द्यावर राजकारण होत असल्याची टीका केंद्रीय मंत्री तथा आरपीआय नेते रामदास आठवले यांनी केली आहे. यापूर्वी शिवसेना सत्तेत असताना नामकरण  का केले नाही, असा सवाल करतानाच आता शिवसेनेने नामकरणाचा आग्रह केला तर काँग्रेस त्यांना सोडून जाईल, असे भाकीतही त्यांनी यावेळी केले. 
नाशिकमधील शासकीय विश्रामगृहात रामदास आठवले यांनी शुक्रवारी (दि. ८) पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधला. ते म्हणाले, छत्रपती संभाजी राजे यांच्या नावाला आमचा विरोध नाही; मात्र तेथील  विमानतळ‌ाला अजिंठा-वेरूळ असे नाव द्यावे, अशी मागणी करतानाच नामंतराच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि शिवसेनेतील ताणलेल्या संबंधाकडेही त्यांनी लक्ष वेधत राज्यातील सरकार आपसातील मतभेदांमुळे कोसळून पुन्हा देवेंद्र फडणवीस यांचे सरकार येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, देशभरातील कोरोना स्थितीवर बोलताना कोरोनामुळे आर्थिक स्थिती खालावल्याचे मान्य करतानाच लसीकरणाचा खर्च करावा असे मत त्यांनी व्यक्त केले. 
निवडणुका भाजपसोबतच
राज्यभरात होऊ घातलेल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आरपीआय आणि भाजप एकत्र लढविणार असून नाशिकमध्येही भाजपसोबच राहणार असय्याचे रामदास आठवले यांनी स्पष्ट केेले. मात्र त्यासाठी आम्हाला आमच्या ताकदीप्रमाणे सन्मानजनक जागा मिळाव्यात अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. 
मराठा आरक्षणात सरकार अपयशी 
मराठा आरक्षण प्रकरणात उद्धव ठाकरे यांचे सरकार न्यायालयात भक्कम बाजू मांडण्यात अपयशी ठरल्याची टीका रामदास आठवले यांनी केली आहे. त्याचप्रमाणे हे प्रकरण न्यायालयात असल्याने केंद्र सरकारला हस्तक्षेप करता येत नसल्याचे नमूद करीत राष्ट्रीय स्तरावर आम्हाला सर्वांगीण विचार करून निर्णय घ्यावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र मराठा समाजाला समाजाच्या मागणीनुसार ओबीसीतून नव्हे तर वेगळे आरक्षण द्यावे अशीच आमची भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  
ट्रम्प यांच्याशी संवाद साधणार
नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना रामदास आठवले यांनी विविध विषयांना स्पर्श करतानाच अमेरिकेतील सत्तासंघर्षावरही भाष्य करताना अमेरिकन संसदेत ट्रम्प समर्थकांनी घातलेला गोंधळ योग्य नसल्याची टीका करतानाच हा लोकशाहीचा आणि रिपब्लिकन पक्षाचा अपमान असल्याचे मत व्यक्त केले. ट्रम्प यांनीही पराभव मान्य करावा असे आवाहन करतानाच या विषयावर ट्रम्प यांच्याशी फोनवर चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: No objection to naming Sambhajinagar: Ramdas Athavale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.