शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नो गुंडे, ओन्ली मुंढे ; तुकाराम मुंढेंच्या समर्थनार्थ नाशिककर रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 12:44 IST

नाशिक- करवीढीचा बोजा लादल्याने टिकेचे धनी ठरलेल्या आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर अविश्वासाचा ठराव सिद्ध करुन मुंढेंना नाशकातुन अन्यत्र पाठवून देण्याच्या इराद्याने बोलविण्यात आलेल्या महासभेच्या पार्श्वभूमीवर मुंढेंसारखा अधिकारी नाशकातच रहावा यासाठी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व मुंढे समर्थक नागरिकांनी शुक्रवारी(दि.३१) रॅलीद्वारे समर्थन दर्शवले.मुंढेंविरुद्ध अविश्वासाच्या ठरावाची चर्चा सर्वत्र पसरु लागताच दोन दिवसांपासून ...

नाशिक- करवीढीचा बोजा लादल्याने टिकेचे धनी ठरलेल्या आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर अविश्वासाचा ठराव सिद्ध करुन मुंढेंना नाशकातुन अन्यत्र पाठवून देण्याच्या इराद्याने बोलविण्यात आलेल्या महासभेच्या पार्श्वभूमीवर मुंढेंसारखा अधिकारी नाशकातच रहावा यासाठी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व मुंढे समर्थक नागरिकांनी शुक्रवारी(दि.३१) रॅलीद्वारे समर्थन दर्शवले.मुंढेंविरुद्ध अविश्वासाच्या ठरावाची चर्चा सर्वत्र पसरु लागताच दोन दिवसांपासून सोशल मिडीयावर त्यांचे समर्थक व विरोधकांमध्ये सोशल वॉर पहायला मिळत होते. जनमत संग्रहसाठी नागरिकांची लेखी मतेही गोळा करण्यात आली होती. शनिवारी (दि.३१) होणाऱ्या महासभेच्या पार्श्वभूमीवर गोंधळ होण्याची शक्यता असल्याने पोलीसांनी या ‘वॉक फॉर कमिशनर’ला परवानगी नाकारली होती. मात्र गुरुवारी रात्री उशिरा रॅलीला परवानगी मिळाली. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जनतेच्या समस्या समजावून घेण्यासाठी ‘वॉक विथ कमिशनर’ हा उपक्रम सुरु केला होता. त्याच्याच पार्श्वभूमीवर आज मुंढे समर्थक नाशिककरांनी ‘वॉक फॉर कमिशनर’ हा नारा देत रॅली काढली. गोल्फ क्लब येथुन सकाळी १० वाजता रॅलीला प्रारंभ झाला. रॅलीत ‘नो गुंडे, ओन्ली मुंढे’च्या घोषणा देत, मुंढेंना समर्थन देणारा मजकूर लिहीलेले फलक हातात घेत हजारो नाशिककर सहभागी झाले होते.महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर विविध घोषणा देत रॅलीचा समारोप झाला.

टॅग्स :Nashikनाशिकtukaram mundheतुकाराम मुंढे