स्वस्त धान्य दुकानात शासनाने जाहीर केलेला तांदूळ मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 05:48 PM2020-04-04T17:48:09+5:302020-04-04T17:49:41+5:30

मांडवड : कोरोना या साथीच्या आजारामुळे देशात संचारबंदी लागु आहे, परिणामी शासनाच्या अन्न धान्य पुरवठा विभागाने गरिबांना एप्रिल, मे व जुन हे तीन महीने पाच किलो तांदूळ मोफत देणार असल्याच्या बातम्या वृत्तपत्रातून सोशल मीडियावर जाहीर झाले. मात्र प्रत्यक्ष जेव्हा चालु महीन्याचा रेशन कोठा वाटपास सुरवात झाली, तेव्हा पाच किलो मोफतचे तांदूळ मिळत नसल्याने नागरिकांनी स्वस्त धान्य दुकानदार समोर प्रश्नांचा भडीमार केला. मात्र रेशन दुकानात तुमचा मोफत मिळणारा तांदूळ अद्याप आलाच नाही तर मी कुठुन देणार असे लक्ष्मीनगर येथील स्वस्त धान्य विर्कता नागरिकांनी सांगत आहे.

No government-issued rice found in cheap grain shops | स्वस्त धान्य दुकानात शासनाने जाहीर केलेला तांदूळ मिळेना

लक्ष्मीनगर येथील स्वस्त धान्य दुकानात आलेले लाभार्थी.

googlenewsNext
ठळक मुद्दे तांदूळ अद्याप आलाच नाही तर मी कुठुन देणार असे लक्ष्मीनगर येथील स्वस्त धान्य विर्कता नागरिकांनी सांगत आहे.

मांडवड : कोरोना या साथीच्या आजारामुळे देशात संचारबंदी लागु आहे, परिणामी शासनाच्या अन्न धान्य पुरवठा विभागाने गरिबांना एप्रिल, मे व जुन हे तीन महीने पाच किलो तांदूळ मोफत देणार असल्याच्या बातम्या वृत्तपत्रातून सोशल मीडियावर जाहीर झाले. मात्र प्रत्यक्ष जेव्हा चालु महीन्याचा रेशन कोठा वाटपास सुरवात झाली, तेव्हा पाच किलो मोफतचे तांदूळ मिळत नसल्याने नागरिकांनी स्वस्त धान्य दुकानदार समोर प्रश्नांचा भडीमार केला. मात्र रेशन दुकानात तुमचा मोफत मिळणारा तांदूळ अद्याप आलाच नाही तर मी कुठुन देणार असे लक्ष्मीनगर येथील स्वस्त धान्य विर्कता नागरिकांनी सांगत आहे.
यावर नांदगावचे पुरवठा अधिकारी महेश मखचले यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सध्या चालु महीन्याचे रेशन प्राप्त झालेले आहे, या महीनाअखेर सर्व रेशन धारकांचे जो शासनाकडून मोफत दिला जाणारा तांदूळ आहे तो मिळेल असे सांगितले. यासाठी आपला दर महीन्याचा जो कोठा आहे तो घेतल्यानंतरच आपणच मोफतचा पाच किलो तांदूळ मिळेल. येणारा तांदूळ हा एफ सी आय कडुन प्राप्त होणार असुन त्याची अंमलबजावणी चालू असल्याने हा उशीर झाला आहे, तरी नागरीकांनी ही बाब संयमाने घ्यावी अशी सुचना पुरवठा आधिकारी यांनी देताच नागरिकांनी आपले धान्य घेण्यास सुरु वात केली आहे.

Web Title: No government-issued rice found in cheap grain shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.