शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

फास्टॅग नाही ना, मग दुपटीने टोल भरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 4:12 PM

 : गणेश शेवरे पिंपळगाव बसवंत : कॅशविना इलेक्ट्रॉनिक टोल पेमेंटसाठी दि. १ डिसेंबरपासून फास्टॅग अनिवार्य करण्यात आले होते. राज्य महामार्ग आणि शहरी टोल नाक्यावर फास्टॅगने टोल स्वीकारला जात आहे. ज्या वाहनांवर अद्यापही फास्टॅग नसेल त्या वाहनचालकाकडून दुप्पट टोल वसूल करण्यात येत आहे. परिणामी फास्टॅग न लावलेल्या वाहनांमुळे टोल नाक्यावर वाहनांची मोठी गर्दी होऊन मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.

ठळक मुद्दे वाहनांच्या गर्दीने टोल नाक्यावर गोंधळ

गेल्या महिन्याभरापासून फास्टॅग लावण्याची प्रक्रि या बँक व टोल नाका प्रशासनाकडून सुरू आहे. दि. १ डिसेंबरपर्यंत फास्टॅग लावणे बंधनकारक केले होते, परंतु तांत्रिक गोष्टीमुळे अडचणी येत होत्या, त्यामुळे दि. १५ डिसेंबरची वाढीव मुदत देण्यात आली होती तरीदेखील असंख्य वाहनांना अजूनही फास्टॅग लावण्याची प्रक्रि या सुरू असल्याने टोल नाक्यावर मोठी गर्दी निर्माण झाली आहे.केंद्र व राज्य शासनाने फास्टॅग लागू करण्याची सक्ती केली आहे. त्यानुसार नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन प्रोग्रामअंतर्गत दि. १ डिसेंबरपासून संपूर्ण देशात सर्व प्रकारच्या चारचाकी वाहनांवर फास्टॅग लावणे अनिवार्य केले होते. फास्टॅगच्या माध्यमातून वाहनांना टोल नाक्यावर न थांबता टोल चुकता करता येणार आहे. त्यासाठी वाहनांवर फास्टॅग लावणे आवश्यक आहे. फास्टॅग हा बँकांकडून खरेदी करून टोल नाक्यावर आॅटोमॅटिक ट्रान्झॅक्शनसाठी वाहनाच्या विंडस्क्र ीनमध्ये फास्टॅग लावला जातो.वाहनांना फास्टॅग लावल्याचे फायदेफास्टॅग एक पारदर्शी व्यवस्था असून, मोटारीवर लागलेल्या फास्टॅगच्या मदतीने वाहनचालकांचा वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. त्यामुळे टोल नाक्यावर वाहतूक कोंडी होणार नाही. चोरीची गाडी टोल नाक्यावर गेल्यावर वाहन मालकाला एसएमएस येईल व त्यामुळे गुन्हे आणि गुन्हेगारांवर नियंत्रण येण्यास मदत होणार आहे. फास्टॅगला जीएसटी नेटवर्कसोबत जोडण्यात आले आहे. या यंत्रणेत वाहनमालक आणि वाहनाची माहिती असल्याने ही यंत्रणा आधारच्या धर्तीवर काम करणार आहे. इतकेच नव्हे तर सर्व मार्ग फास्टॅगचे झाल्यास केवळ एकाच मार्गावर रक्कम स्वीकारली जाणार आहे. फास्टॅगचा उपयोग करणाऱ्यांना कॅशबॅकचा फायदाही मिळणार आहे.या अडचणी केव्हा दूर होणार ?फास्टॅगमुळे वाहनचालकांना फायदा मिळेल, पण सध्या टोल नाक्यावर फास्टॅगबाबत ज्या अडचणी येत आहेत, त्यावर वाहनचालकांना खरंच दिलासा मिळेल का, हा प्रश्न गंभीर आहे. टोल नाक्यावर आताही नेटवर्कची समस्या असल्यामुळे बहुतांशवेळी वाहनचालकांना थांबावे लागते. अनेक ठिकाणी कॅमेरेच सुरळीत नाहीत. त्यामुळे टोल नाक्यावरील कर्मचारी फास्टॅगला हाताने स्कॅन करताना दिसून येताहेत. आताही नाक्यावर फास्टॅगचे मार्ग जास्त नसल्यामुळे फास्टॅग लागलेल्या वाहनांना टोल नाक्यांवर समस्या येत आहेत.दुचाकीस्वारांना नाहक त्रास; दळणवळणात मोठी कोंडी?दि. १५ डिसेंबरपासून फास्टॅगची सक्ती केल्याने ज्या वाहनधारकांनी अद्याप वाहनांना फास्टॅग लावलेला नाही त्या वाहनांमुळे टोल नाक्यावर वाहनांची मोठी गर्दी होऊन गोंधळ निर्माण होत आहे. परिणामी ज्यांचा टोलशी संबंध नाही अशा दुचाकीस्वारांना यामुळे अडचणीचा सामना करावा लागत आहे. दळणवळणातदेखील अडचण निर्माण होत आहे.‘फास्टॅग’ नसलेली गाडी विशेष लेनमध्ये आल्यास दंडदेशांतर्गत दळणवळणासाठी सर्व प्रकारच्या गाड्यांना (दुचाकी वगळून) फास्टॅग बंधनकारक केले आहे. जर गाडीला फास्टॅग नसेल आणि गाडी फास्टॅगसाठी बनविलेल्या विशेष लेनमध्ये आल्यास दंड म्हणून दुप्पट टोलवसुली केली जाणार आहे. यामुळे गोंधळात भर पडली आहे.टोल नाक्यावर विक्र ीची सोयमहामार्गावरील टोल नाक्यावर हे ‘फास्टॅग’ विक्र ीची सोय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या आधीच करण्यात आली आहे. राष्ट्रीय प्राधिकरणाचे एकूण ५३७ टोल नाके आहेत. यापैकी ४१२ टोल नाक्यांवरील सर्व लेन ‘फास्टॅग’ने संचलित केल्या आहेत.बसला फास्टॅगच वावडं....केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्रालय आणि भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणकडून दि. १ डिसेंबर २०१९ पासून सगळ्याच चारचाकी वाहनांना फास्टॅग अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे फास्टॅग लावलेली वाहने टोल नाक्यावर थांबतही नाही, पण महामंडळाची लाल परी याला अपवाद ठरत आहे. टॅग लावूनही टॅग स्कॅन होत नसल्याने बस जास्त काळ टोल नाक्यावर थांबून राहत असल्याने टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांना तो टॅग हाताने स्कॅन करावा लागत आहे. ....