दिंडोरी : शहरात मुख्य चौफुलीवर दररोज सायंकाळी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने दिंडोरी शहरातून सायंकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत जड वाहतूक बंद करण्याबाबत नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक आरती सिंग यांनी अधिसूचना जारी केली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, दिंडोरी शहरातून नाशिक कळवण रस्ता जात असून दिंडोरी पालखेड वणी लखमापूर औद्योगिक वसाहतीतील जड वाहने यांची नेहमी ये जा होत असते. त्यात पालखेडरोडने औद्योगिक वसाहतीतील अवजड वाहने मोठ्या प्रमाणात ये जा करतात. त्यामुळे सायंकाळी पाच ते नऊ च्या दरम्यान शहरात मोठा वाहतूक खोळंबा होत वाहतुकीची कोंडी होत लांबच लांब रांगा लागतात. यावर मार्ग काढण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे १७ मे ते १३ जूनपर्यंत पालखेड रोडसह आक्र ाळे ते अवनखेड दरम्यान सायंकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत कंटेनर्स, ट्रेलर्स व बाराचाकी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अधीक्षक आरती सिंग यांनी अधिसूचना निर्गमित केली आहे.
दिंडोरीत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जड वाहनांना नो एन्ट्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 13:27 IST