ना कोचिंग क्लास, ना मार्गदर्शन; यशाचे गुपीत सांगे सुदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:16 IST2021-09-26T04:16:40+5:302021-09-26T04:16:40+5:30

लोहोणेर येथील बसवाहक नानासाहेब सोनवणे यांचा सुपुत्र असलेल्या सुदर्शन या विद्यार्थ्याने भूगोल या विषयाची पदवी संपादन करून २०१४ मध्ये ...

No coaching classes, no guidance; Tell the secret of success Sudarshan | ना कोचिंग क्लास, ना मार्गदर्शन; यशाचे गुपीत सांगे सुदर्शन

ना कोचिंग क्लास, ना मार्गदर्शन; यशाचे गुपीत सांगे सुदर्शन

लोहोणेर येथील बसवाहक नानासाहेब सोनवणे यांचा सुपुत्र असलेल्या सुदर्शन या विद्यार्थ्याने भूगोल या विषयाची पदवी संपादन करून २०१४ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला. प्रारंभी मित्रांसोबत पुण्याला अभ्यास केला, त्यानंतर नाशिक येथे सुरुवातीला रोज दहा-बारा तास वेगवेगळ्या पुस्तकांच्या वाचनावर त्याने भर दिला. त्यानंतर सुदर्शनच्या असे लक्षात आले की, रोज वेळेच्या आकड्यांवर भर देण्यापेक्षा गुणवत्तेवर भर देत परीक्षेसाठी आवश्यक असलेला अभ्यास केला तरी यश मिळू शकते. हे तंत्र लक्षात ठेवून कोणताही क्लास न लावता त्याने अभ्यास केला, मात्र या दरम्यान त्यास कोणाचेही मार्गदर्शन लाभले नाही. तरीदेखील त्याने चिकाटीने सहाव्या प्रयत्नात ६९१वी रँक मिळवित यश संपादन केले. या यशाने असमाधानी असलेल्या सुदर्शनला पुन्हा एक संधी घेऊन आएएस व्हायचे असून, त्याने त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे.

फोटो - २५सुदर्शन सोनवणे

250921\25nsk_37_25092021_13.jpg

सुदर्शन सोनवणे

Web Title: No coaching classes, no guidance; Tell the secret of success Sudarshan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.