शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

शासकिय विश्रामगृहाच्या परिसरात प्रवेशास मज्जाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2019 8:30 PM

वाहनचालकांनी चांडक सर्कलकडून जलतरण तलावमार्गे मायको सर्कलकडे रवाना व्हावे, असे आदेशात म्हटले आहे.

ठळक मुद्देगुरूवारपर्यंत पर्यायी मार्गाचा वापर करावारामनाथ कोविंद हे बुधवारी (दि.९) सायंकाळी नाशिक येथे मुक्कामी येत आहेत

नाशिक : भारताचे १४वे राष्ट्रपती  रामनाथ कोविंद हे बुधवारी (दि.९) सायंकाळी नाशिक येथे मुक्कामी येत आहेत. ते गुरूवारी (दि.१०) सकाळपर्यंत शासकिय विश्रामगृहात थांबणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून विश्रामगृहाच्या परिसरात पादचाऱ्यांपासून सर्वच प्रकारच्या वाहनचालकांना प्रवेश निषिध्द करण्यात आल्याचे उपआयुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी सांगितले.रामनाथ कोविंद हे शासकीय विश्रामगृहात थांबणार आहे. त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव विश्रामगृहाच्या परिसरात शासकिय सेवेतील वाहने वगळता अन्य सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे गडकरी सिग्नलकडून चांडक सर्कल आणि पर्यटन विकास महामंडळाकडून ईदगाह मैदान, जॉगींग ट्रॅकच्या परिसरात जाणाºया रस्त्यांवरील सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात येणार आहे. तसेच या भागात पादचाऱ्यांनाही प्रवेश नाकारण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी गुरूवारपर्यंत पर्यायी मार्गाचा वापर करावा असे अधिसूचनेत म्हटले आहे. मुंबईनाक्याकडून चांडकसर्कलकडे येणारी वाहतूक मायकोसर्कलवरून पुढे मार्गस्थ होईल तसेच गडकरी चौकातून कोणत्याही दिशेने आलेले वाहन शासकिय विश्रामगृहाकडे जाणाºया रस्त्याचा वापर करणार नाही. वाहनचालकांनी चांडक सर्कलकडून जलतरण तलावमार्गे मायको सर्कलकडे रवाना व्हावे, असे आदेशात म्हटले आहे. या आदेशाचे पालन सर्व नागरिकांनी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Presidentराष्ट्राध्यक्षRamnath Kovindरामनाथ कोविंदNashikनाशिक