एनएमआरडीएचे कार्यालय होणार

By Admin | Updated: July 10, 2016 01:29 IST2016-07-09T00:02:22+5:302016-07-10T01:29:32+5:30

२५ लाखांचा निधी मंजूर : मुंबई येथील बैठकीत झाला निर्णय

NMRDA's office will be held | एनएमआरडीएचे कार्यालय होणार

एनएमआरडीएचे कार्यालय होणार


 गणेश धुरी ल्ल नाशिक
नाशिक महानगर विकास प्राधिकरणसाठी (एनएमआरडीए) २५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून, एनएमआरडीएचे नाशिकला स्वतंत्र कार्यालय होण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि.८) मंजुरी दिली. तसेच तूर्तास नाशिक महानगर नियोजन प्राधिकरणचा कारभार सिडको कार्यालयातून चालविण्यासही संमती देण्यात आली.
मुंबई येथे सह्णाद्री अतिथीगृहावर शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक महानगर विकास प्राधिकरणची पहिलीच बैठक झाली. बैठकीत तीनही विषयांना मंजुरी देण्यात आली. त्यात नाशिक येथे स्वतंत्र कार्यालय, त्यासाठी निधीची तरतूद तसेच नाशिक शहरालगतच्या सहा तालुक्यांच्या प्रारूप विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली. मुंबई महानगर विकास प्राधिकरणच्या धर्तीवरच नाशिक महानगर विकास प्राधिकरणची रचना असेल. नाशिक महानगर विकास नियोजनाच्या कामकाजासाठी आवश्यक ती स्टेशनरी व विविध साहित्य खरेदीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीची मदत म्हणून २५ लाखांचा निधी मंजूर केला. तसेच या समितीचे कामकाज जिल्हा नियोजन समितीप्रमाणेच चालणार असून, त्यासाठी आयएएस अधिकाऱ्याचीही लवकरच नियुक्ती करण्यात येणार आहे. या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष मुख्यमंत्री, तर सचिव प्रधान सचिव व विभागीय आयुक्त राहणार आहेत. नाशिक महानगर विकास प्राधिकरणचे काम प्रामुख्याने शहरालगतच्या परिसराचा विकास करणे, रस्ते व पाणी या पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करणे तसेच शहरी व ग्रामीण भाग मिळून स्वतंत्र विकास आराखडा तयार करणे हे राहणार आहे. तूर्तास या समितीचे कामकाज सिडकोच्या कार्यालयातून सुरू राहणार असून त्यासाठी सिडको कार्यालयाची यंत्रणा वापरण्याची मुभा नगरविकास विभागाने दिली आहे. सुमारे ६५ जणांची ही समिती असून त्यात राज्य स्तरावरील वरिष्ठ अधिकारी तसेच जिल्ह्णातील प्रमुख लोकप्रतिनिधी यांचा समावेश आहे. शुक्रवारी झालेल्या बैठकीस नगर विकासच्या प्रधान सचिवांसह विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, जि. प. अध्यक्ष विजयश्री चुंभळे, आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, योगेश घोलप, सीमा हिरे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, भगूर नपाचे प्रतिनिधी म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, दोनवाडे सरपंच शैला ठुबे, पळसे सरपंच नवनाथ गायधनी, महापालिकेचे नगरसेवक उद्धव निमसे, सुनीता निमसे, कविता कर्डक आदिंसह नगरविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Web Title: NMRDA's office will be held

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.