परदेशी पाहुण्यांकडून मनपा शाळेची पाहणी
By Admin | Updated: October 30, 2015 22:58 IST2015-10-30T22:57:14+5:302015-10-30T22:58:22+5:30
परदेशी पाहुण्यांकडून मनपा शाळेची पाहणी

परदेशी पाहुण्यांकडून मनपा शाळेची पाहणी
नाशिकरोड : स्वच्छ भारत योजनेसाठी परदेशातील पाच संस्थांनी २ ते ५ नोव्हेंबरदरम्यान आयोजित केलेल्या ‘कम्युनिटी प्लम्बिंग चॅलेंज स्पर्धा’च्या निमित्ताने दत्तमंदिररोड मनपा शाळा क्रमांक १२५ची पाहणी करून शिक्षकांना स्पर्धेबाबत विविध सूचना करण्यात आल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत योजनेच्या यशस्वीतेसाठी परदेशातील पाच संस्था देशामध्ये विविध उपक्रम राबवत आहे. इंडियन प्लम्बिंग असोसिएशन व वर्ल्ड स्कील काउन्सिल यांच्या वतीने कम्युनिटी प्लम्बिंग चॅलेंज स्पर्धेसाठी दत्तमंदिर रोड येथील मनपा शाळा क्रमांक १२५ची निवड करण्यात आली आहे. २ ते ५ नाव्हेंबरदरम्यान होणाऱ्या स्पर्धेसाठी शुक्रवारी आॅस्ट्रेलियाचे ग्रॅँट स्टुअर्ट, जेफ्री बॉल, आयलंडचे शॉन कार्नी, स्वाती सरल्या, मिलिंद शेटे यांनी मनपा शाळा १२५ची पाहणी
केली. स्पर्धेबाबत शौचालय, कार्यालय, पिण्याच्या पाण्याची टाकी, वॉशरूम व शाळेचा परिसर व खोल्या स्वच्छतेबाबत सूचना केल्यात. यावेळी नगरसेवक रमेश धोंगडे, संगीता गायकवाड, मुख्याध्यापक शोभा गुरव, राजश्री गांगुर्डे यांनी परदेशातील आलेल्या मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. (प्रतिनिधी)