पंचवटी विभागात महापालिकेची २७ कोटी वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:15 IST2021-04-23T04:15:55+5:302021-04-23T04:15:55+5:30
यंदाही कोरोना संसर्ग असल्याने त्याचा महसूल वसुली करण्यावर परिणाम जाणवला आहे. १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या ...

पंचवटी विभागात महापालिकेची २७ कोटी वसुली
यंदाही कोरोना संसर्ग असल्याने त्याचा महसूल वसुली करण्यावर परिणाम जाणवला आहे.
१ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या आर्थिक वर्षात घरपट्टी व पाणीपट्टी मिळून सुमारे २७ कोटी ७४ लाख ५० हजार रुपये वसूल करण्यात आले आहे. पंचवटीत जवळपास १ लाख ५७४ मिळकतधारक आहे. सर्वांना मनपा प्रशासनातर्फे घरपट्टी व पाणीपट्टी देयक वाटप करण्यात आले आहे. त्यानुसार पंचवटी मनपा विभागीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी पंचवटी विभागात वसुलीची मोहीम राबवित आहे.
वर्षभराच्या कालावधीत पाणीपट्टीची ९ कोटी १० लाख ५३ हजार ७० तर १८ कोटी ६३ लाख ९८ हजार इतकी घरपट्टीची रक्कम वसूल करण्यात आली आहे. कर थकबाकीदारांना जप्ती नोटीस बजावण्यात आल्या असून, नोटीस बजावल्यानंतर संबंधित थकबाकीदारांनी कर न भरल्यास जप्त मालमत्तेचा जाहीर लिलाव केला जाणार आहे.
इन्फो===
ऑनलाइन कर भरण्याकडे कल
संपूर्ण देशात कोरोना महामारी संसर्ग वाढत चालल्याने प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे. महापालिका कार्यालयात देखील नागरिकांना विनाकारण प्रवेश दिला जात नाही तर मनपाचा कर भरण्यासाठी नागरिकांना ऑनलाइन सुविधा उपलब्ध असल्याने नागरिक नेट बँकिंगच्या माध्यमातून महापालिकेचा कर भरत आहे.