शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कालिदास बंदमुळे महापालिकेला २० लाख रुपयांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 18:12 IST

नाशिक - लॉक डाऊन आणि संचार बंदी मुळे नाशिक महापालिकेचे महाकवी कालिदास कलामंदिर गेल्या तीन महिन्यांपासून बंद असून त्यामुळे ...

ठळक मुद्देतीन महिन्यांपासून बंदपन्नासहून अधिक कार्यक्रम रद्द

नाशिक - लॉक डाऊन आणि संचार बंदी मुळे नाशिक महापालिकेचे महाकवी कालिदास कलामंदिर गेल्या तीन महिन्यांपासून बंद असून त्यामुळे सुमारे पन्नासहून अधिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत त्यामुळे पालिकेला सुमारे 20 लाख रुपयांचा फटका बसला आहे तर दादासाहेब गायकवाड सभागृह आणि पंडित पलुस्कर सभागृह बंद असल्याने सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.गेल्या महिन्यात कोरोनाचे संकट आल्यामुळे केंद्र सरकारने लॉक डाऊन आणि संचारबंदी लागू केली त्यानंतर मे महिन्यापासून लॉक डाऊन मध्ये शीथीलता दिली असली तरी अत्यावश्यक सेवा आणि उद्योग व्यवसायांना परवानगी दिली आहे. मात्र, आता जनजीवन सुरळीत होत असले तरी अद्यापही चित्रपट- नाटक यासारख्या गर्दी जमा होतील त्या ठिकाणांना कार्यक्रम घेण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेला देखील मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे.मार्च महिन्यापासून आतापर्यंत कालिदास कलामंदिर आणि दादासाहेब गायकवाड सभागृहातील एकूण 50 हुन अधिक कार्यक्रम रद्द झाले आहेत. त्यामुळे भाडे मिळणे तर सोडाच रद्द कार्यक्रमांची अनामत रक्कम सुद्धा आयोजकांना द्यावी लागली आहे.कालिदास कलामंदिरात दर महिन्याला होणारी नाटके, परिषदा, बैठका कार्यक्रमातून महापालिकेला पाच ते सहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळते दादासाहेब गायकवाड सभागृह आणि पंडित पलुस्कर सभागृह त्यांच्या भाड्यातून सुमारे तीन ते पाच लाख रुपये उत्पन्न मिळते पंडित पलुस्कर सभागृहाचे नूतनीकरण सुरू असल्यामुळे सध्या ते बंद आहे.कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह केवळ मोठ्या कार्यक्रमांसाठी भाड्याने घेतले जाते.कालिदास कलामंदिर नियमितपणे वापरात असले तरी यात होणारे नाटके आणि अन्य कार्यक्रम रद्द करण्यात आल्यामुळे महापालिकेला आत्तापर्यंत 20 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने जनजीवन सुरळीत करण्यासाठी अनेक निर्बंध शिथिल केले असले तरी नाटकासारख्या कार्यक्रमाच्या ठिकाणी होणारी गर्दी बघता अद्याप या ठिकाणी कार्यक्रम घेण्यास परवानगी नाही त्यामुळे कालिदास चे नुकसान दिवसेंदिवस वाढतच आहे. सध्या लॉक डाऊन मुळे रंगभूमीवर नवीन नाटके येऊ शकत नाहीत. त्यामुळे नाटकांचे चित्रीकरण करून ते पाहण्यासाठी रसिकांना उपलब्ध करून देण्याची अभिनव सूचना अभिनेता पुष्कर श्रोत्री यांनी केली होती मात्र नाटकाचे चित्रीकरण करायचे असले तरी कलाकार आणि तंत्रज्ञ त्यांची एकूण संख्या ही पाच पेक्षा अधिक होणार असल्यामुळे अशा प्रकारची परवानगी मिळेल आणि कालिदास कलामंदिर मध्ये अशा प्रकारचे चित्रीकरण होणे शक्य नसल्याचे सूत्रांनी सांगितले

टॅग्स :NashikनाशिकartकलाNatakनाटक