शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
7
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
8
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
9
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
10
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
11
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
12
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
13
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
14
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
15
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
16
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
17
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
18
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
19
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
20
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...

महापालिका : राखीव निधीतून करणार खर्च; दरमहा पेन्शन देण्याचे नियोजन दिव्यांगांसाठी पेन्शन योजनेचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 1:10 AM

नाशिक : दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या तीन टक्के राखीव निधीतून शहरातील दिव्यांगांना पेन्शन योजना सुरू करण्याचा विचार महापालिकेने चालविला आहे.

ठळक मुद्दे७ हजार दिव्यांग आढळून आले चालू वर्षाच्या अंदाजपत्रकात तरतूद

नाशिक : दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या तीन टक्के राखीव निधीतून शहरातील दिव्यांगांना पेन्शन योजना सुरू करण्याचा विचार महापालिकेने चालविला असून, त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना वैद्यकीय विभागाला देण्यात आल्या आहेत. महापालिकेने आॅगस्ट २०१७ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात सुमारे ७ हजार दिव्यांग आढळून आले होते. महापालिकेकडून दरमहा १५०० ते २००० रुपये पेन्शन देण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे गरजू दिव्यांगांना त्याचा मोठा आधार लाभणार आहे. महापालिकेने अपंग पुनर्वसन कायद्यानुसार दिव्यांग व्यक्तींना सोयीसुविधा पुरविण्याचा निर्णय घेत त्यासाठी सुमारे २० कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे, तर सुमारे १४ कोटी रुपये चालू वर्षाच्या अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आलेली आहे. महापालिकेने दि. ८ ते २४ आॅगस्ट २०१७ या कालावधीत शहरात दिव्यांगांचा सर्व्हे केला होता. त्यावेळी पथकाने ४ लाख ८६ हजार ९९१ घरांना भेटी दिल्यानंतर ६३७१ व्यक्तींना विविध प्रकारचे अपंगत्व असल्याचे समोर आले होते तर १९३९ व्यक्तींकडेच अपंगत्वाचे प्रमाणपत्र आढळून आले होते. सर्वेक्षणानंतरही महापालिकेकडे नोंदी होत राहिल्या. त्यामुळे दिव्यांगांची संख्या ७ हजाराच्या आसपास जाऊन पोहोचलेली आहे. महापालिकेने दिव्यांगांसाठी विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केलेली आहे. तीन टक्के राखीव निधीतून दिव्यांगांसाठी पेन्शन योजना सुरू करण्याचा विचार महापालिकेने चालविला असून, त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र भंडारी यांना देण्यात आल्या आहेत. सर्वसाधारणपणे ज्यांच्याकडे अपंगत्वाचे प्रमाणपत्र आहे, त्यांना या योजनेचा लाभ दिला जाण्याची शक्यता आहे.याशिवाय, अपंगत्वाच्या टक्केवारीनुसारही पेन्शन देण्याची योजना आहे. वैद्यकीय विभागाने सविस्तर प्रस्ताव सादर केल्यानंतर त्यानुसार पुढे महासभेची मंजुरी घेऊन कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.पिंपरी-चिंचवड, नगरला योजनाराज्यातील पिंपरी-चिंचवड महापालिकेने दिव्यांगांसाठी पेन्शन योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. तेथील सर्वसाधारण सभेने दिव्यांगांना दरमहा दोन हजार रुपये पेन्शन देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे तर अहमदनगर महापालिकेनेही दिव्यांगांसाठी पेन्शन योजना सुरू केली आहे. त्याच धर्तीवर नाशिक महापालिकेमार्फतही पेन्शन योजना सुरू करण्याचा विचार आहे. त्यासाठी महापालिकेला सुमारे १ ते १.२५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.