शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

शालार्थ आयडी प्रकरणातील निलंबित नितीन बच्छाव अहमदनगरचे शिक्षणाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 16:16 IST

शालार्थ आयडी प्रकरणात निलंबनाची कारवाई झालेले जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी  तथा प्रभारी शिक्षण उपसंचालक नितिन बच्छाव यांची अहमदनगर येथे शिक्षणाधिकारी (निरंतर) म्हणुन नियुक्ती झाली आहे. त्यांच्यावर शालार्थ आयडी गैरव्यवहार प्रकरणात निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

ठळक मुद्देनितिन बच्छाव यांची अहमदनगर शिक्षणाधिकारीपदी नियुक्ती बच्छाव यांच्याकडेच अजूनही नाशिकच्या कपाटाच्या चाव्या

नाशिक : बनावट शालार्थ आयडी प्रकरणात निलंबनाची कारवाई झालेले जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी  तथा प्रभारी शिक्षण उपसंचालक नितिन बच्छाव यांची अहमदनगर येथे शिक्षणाधिकारी (निरंतर) म्हणुन नियुक्ती झाली आहे. त्यांच्यावर शालार्थ आयडी गैरव्यवहार प्रकरणात निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. परंतु,त्याचा निलंबनाचा कालावझी संपल्याने अप्पर मुख्य संचीव यांनी त्यांना पदावर पुन:स्थापित करण्याच्या सुचना केल्या आहेत. दरम्यान, नाशिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील काही महत्त्वाच्या कापटाच्या चाव्याही अजूनही त्यांच्याकडेच असून या चाव्या मिळविण्यासाठी विद्यमान शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांनी त्यांना पत्रही दिले आहे.महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियमानुसार बच्छाव यांच्यावरील  निलंबन उठवून त्यांना अहमदनगर जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (निरंतर), पदावर पुन:स्थापित करण्याच्या सुचना महाराष्ट्र शासनाच्या अप्पर मुख्य संचीव वंदना कृष्ण यांनी शिक्षण आयुक्त पुणे यांना केल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातील जल्ह्यातील सहा शाळा आणि नंदुरबार जिल्ह्यातील एका संस्थेतील नऊ शिक्षकांच्या शालार्थ आयडी मान्यतेप्रकरणी प्रकरणी नाशिकचे तत्कालीन प्रभारी शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव यांना निलंबित करण्यात आाले होते. याच कालावधीत बच्छाव यांच्याकडे नाशिकच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाची जबाबदारीही त्यांच्याकडेच असल्याने या कार्यालयातील काही महत्वाच्या कपाटांच्या चाव्या अजूनी त्यांच्याकडेच असून त्यांनी या चाव्या विद्यमान शिक्षणाधिकारी यांच्याकडे सुपर्द केलेल्या नाही. त्यामुळे विद्यमान शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांनी त्यांना चाव्या सुपर्द करण्यासाठी पत्राद्वारे सुचित करण्यात आल्याची माहिती दिली आहे.  

कामकाज रखडलेलॉकडाऊन काळात रखडलेली शालार्थ आयडीचे काम तसेच तत्कालीन शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव यांच्यावर झालेल्या कारवाई झाल्यानंतर प्रलंबित राहिलेल्या मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व शिक्षकांच्या पद्दोन्नती, भविष्य निर्वाहनिधी आणि विविध प्रकारची रखडलेली आहे. त्याचप्रमाणे शालार्थ आयडीसह, संचमान्यता, डीएड ते बीएच मान्यता संदर्भातील विविध नस्ती अडकून पडल्या आहेत. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकSchoolशाळाTeacherशिक्षक