निसाका कोणाच्याही घशात जाऊ देणार नाही
By Admin | Updated: January 19, 2017 01:08 IST2017-01-19T01:08:34+5:302017-01-19T01:08:49+5:30
राजू शेट्टी : कारखाना तत्काळ सुरू करण्यासाठी दीर्घकालीन धोेरण हवे

निसाका कोणाच्याही घशात जाऊ देणार नाही
नाशिक : काही चुकीच्या धोरणांमुळे आज आर्थिक गर्तेत सापडलेला निफाड सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांनीच चालविला पाहिजे, तो कोणत्याही खासगी व्यक्तीच्या घशात जाऊ दिला जाणार नाही. निसाका विकण्यास स्वाभिमान शेतकरी पक्षाचा विरोध असेल, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले. गोदाकाठ परिसरातील एका कृषी विषयक संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी निफाड तालुक्यातील शेतकरी व निसाका सुरू होण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या निसाका बचाव कृती समितीने हा कारखाना तत्काळ सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन खासदार राजू शेट्टी यांना दिले. शेट्टी म्हणाले की, ५३ गावांचे कार्यक्षेत्र असलेला निसाका बंद राहणे चुकीचे आहे. सुरुवातीला हा कारखाना भाडे तत्त्वावर चालविण्यास द्यावा. ३०० कोटींचे कर्ज फार मोठे कर्ज नाही. त्यासाठी सरकारने दीर्घकालीन धोरण ठरवून कारखाना तत्काळ सुरू करणे गरजेचे आहे.
निफाड साखर कारखान्यावर शेतकऱ्यांचीच मालकी असली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. यावेळी योगेश पाटील, स्वाभिमान
पक्षाचे हंसराज वडघुले, नितीन रोटे-पाटील, शरद लभडे, जगन कुटे, सुनील कुटे, खेलूकर यांच्यासह गोदाकाठ परिसरातील असंख्य नागरिक व शेतकरी उपस्थित होते.(प्रतिनिधी)