शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

माजी आमदार डॉ.निशिगंधा मोगल यांनी भारतीय सेनेला दिली वीस लाखांची मदत..!

By अझहर शेख | Updated: October 29, 2020 16:48 IST

मोगल यांनी दागिण्यांइतकी २० लाखांची रक्कम भारतीय सेनेला पाठवून आपले देशप्रेम व भारतीय सेनेविषयी असलेली कृतज्ञतेची आणि अभिमानाची भावना अनोख्या पध्दतीने दाखवून दिली आहे.

ठळक मुद्देसैनिकांसह त्यांच्या कुटुंबियांप्रती कृतज्ञता स्त्री धनाद्वारे ध्वजनिधीमध्ये योगदान

नाशिक : भारतीय सैनिक व त्यांच्या कुटुंबियांचा त्याग अमुल्य आहे. देशसेवेसाठी निडरपणे आपले सैनिक सीमांचे रक्षण करतात त्या सैनिकांचे हात बळकट करणे व त्यांच्याप्रती आपल्या मनात असलेला आदरभाव वेळोवेळी दाखवून देणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्यच आहे. माजी आमदार डॉ. निशिगंधाताई मोगल यांनी एक आगळावेगळा आदर्श समाजाच्या लोकप्रतिनिधींपुढे मांडला आहे. त्यांनी आपल्याकडील स्त्री धनाच्या माध्यमातून भारतीय सेनेला थेट वीस लाखांची मदत दिली आहे.कुठल्याही प्रतिकुल परिस्थतीचा विचार न करता भारतीय सेना राजस्थानच्या वाळवंटापासून सियाचीन व जम्मु-काश्मीरसारख्या बर्फाळ प्रदेशापर्यंत देशाच्या सीमांचे रक्षण करते. जवान सीमेवर तैनात असताना त्यांच्यापासून कटुंबीय दुरावले जातात आणि त्या कुटुंबीयांचाही त्याग तितकाच महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे शहीदांच्या वीरपत्नी, दिव्यांग जवान, माजी सैनिकांसह जवानांच्या कल्याणकारी कामांसाठी भारतीय सेनेच्या ध्वजनिधीमध्ये मोगल यांनी आपले दागिण्यांच्या माध्यमातून वीस लाखांची मदत भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयाकडे पाठविली आहे. मोगल यांनी सुरुवातीला त्यांच्याकडील सर्व दागिणे भारतीय सेनेला द्यायचे ठरविले मात्र भारतीय सेना कुठल्याहीप्रकारचे दागिणे कोणाकडूनही देणगीस्वरुपातसुध्दा स्विकारत नाही. यामुळे मोगल यांनी दागिण्यांइतकी २० लाखांची रक्कम भारतीय सेनेला पाठवून आपले देशप्रेम व भारतीय सेनेविषयी असलेली कृतज्ञतेची आणि अभिमानाची भावना अनोख्या पध्दतीने दाखवून दिली आहे.भारतीय सेनेने पत्राद्वारे मानले आभारभारत सरकारच्या रक्षा मंत्रालय व सैनिकी बोर्डद्वारे लेखा विभागाचे सहसंचालक लेफ्टनंट कर्नल सौमित्र मिश्रा यांनी नुकतेच काही दिवसांपुर्वी डॉ. निशिगंधा मोगल यांना लेखी पत्र पाठवून आभार मानले आहे. त्यांनी मोगल यांनी दाखविलेल्या स्वयंस्फूर्तीने दाखविलेल्या भारतीय सेना व जवानांच्या कुटुंबियांविषयीच्या दातृत्व भावनेचे कौतुक केले आहे.कारगील युध्दापासून मी मनात निश्चय केला होता. पाच वर्षांपुर्वी जेव्हा मी कारगीलला प्रत्यक्ष भेट दिली तेव्हा तर काळजात धस्स् झाले. इतक्या भयावह परिसरात जवानांनी झुंज देत आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यामुळे यावर्षी मी भारतीय सेनेला सुमारे ५५ तोळे सोन्याच्या दागिण्यांद्वारे २० लाखांची मदत दिली. सेनेचे मिळाले आभारपत्र वाचून मनाला समाधान होत आहे. भारतीय सेना व त्यांचे कुटुंबीय आपल्यासाठी जो त्याग करत देशसेवा बजावतात, त्यापुढे ही मदतदेखील क्षुल्लकच आहे, असे मी मानते.-डॉ. निशिगंधा मोगल, माजी आमदार

भारतीय सेनेविषयी मोगलताई यांनी दाखविलेली दातृत्व समाजाला प्रेरणा देणारे आहे. जवान व त्यांच्या कुटुंबियांविषयीची दाखिवलेली कृतज्ञता अभिमानास्पद आहे. यामुळे भारतीय जवानांचे व त्यांच्या कुटुंबियांचे मनोबल अधिक उंचविण्यास मदत होईल.-वीरपत्नी रेखा खैरनार, अध्यक्ष, त्रिदल वीर नारी, माता-पिता संघटना 

टॅग्स :NashikनाशिकIndian Armyभारतीय जवानMartyrशहीदNational Flagराष्ट्रध्वजDefenceसंरक्षण विभाग