निशा वैजल हिला राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत सुवर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 15:52 IST2019-02-08T15:52:30+5:302019-02-08T15:52:36+5:30

नाशिक : मंड्या, कर्नाटक येथे १४ वर्षाखालील मुला मुलींच्या ६४ व्या शालेय राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघात नाशिकच्या शासकीय कन्या शाळेच्या निशा वैजल हिने महाराष्ट्रातर्फे खेळतानाता सुवर्णपदक मिळविले आहे. एकाच वर्षी दोन राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणारी निशा वैजल ही प्रदीर्घ कालावधीनंतर नाशिक जिल्ह्याची पहिली खेळाडू आहे .

 Nisha Vaishal holds gold in the National Kho-Kho Championship |  निशा वैजल हिला राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत सुवर्ण

 निशा वैजल हिला राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत सुवर्ण

ठळक मुद्देडिसेंबर २०१८मध्ये रु द्रपूर येथे झालेल्या २९ व्या किशोर - किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतील विजेत्या महाराष्ट्राच्या संघात नाशिकच्या मनीषा पडेर , ललिता गोबाले , निशा वैजल या खेळाडूंच्या अष्टपैलू खेळाचा मोठा वाट होता . मंड्या कर्नाटक येथील शालेय राष्टी



नाशिक : मंड्या, कर्नाटक येथे १४ वर्षाखालील मुला मुलींच्या ६४ व्या शालेय राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघात नाशिकच्या शासकीय कन्या शाळेच्या निशा वैजल हिने महाराष्ट्रातर्फे खेळतानाता सुवर्णपदक मिळविले आहे. एकाच वर्षी दोन राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणारी निशा वैजल ही प्रदीर्घ कालावधीनंतर नाशिक जिल्ह्याची पहिली खेळाडू आहे .
डिसेंबर २०१८मध्ये रु द्रपूर येथे झालेल्या २९ व्या किशोर - किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतील विजेत्या महाराष्ट्राच्या संघात नाशिकच्या मनीषा पडेर , ललिता गोबाले , निशा वैजल या खेळाडूंच्या अष्टपैलू खेळाचा मोठा वाट होता . मंड्या कर्नाटक येथील शालेय राष्टीय स्पर्धेतील विजेत्या महाराष्ट्राच्या यशात निशा वैजल हिच्या संरक्षणाचा मोठा वाटा होता .
नाशिक जिल्हा परिषदेच्या शासकीय कन्या शाळेत शिकणाऱ्या निशा वैजल व कु. मनीषा पेडर या दोघी खो-खो खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धेत विजेत्या महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते . या वर्षी जिल्हा परिषदेच्या या दोन्ही खेळाडूंनी सुवर्ण पदक पटकावले आहे . निशा वैजल ही दोन तर मनीषा पडेर हि एका सुवर्ण पदकाची मानकरी ठरली आहे .
या खेळाडूंचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शीतल सांगळे , उपाध्यक्ष नयना गावित,मुख्याधिकारी डॉ. नरेंद्र गीते ,जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती यतीन पाटील , प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली झणकर , विश्वास ठाकूर , शासकीय कन्या शाळेचे मुख्याध्यापक डॉ. चंद्रकांत साळुंखे ,कविता साठे , जिल्हा क्र ीडाधिकारी रवींद्र नाईक, जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष रमेश भोसले यांनी अभिनंदन केले आहे.
निशा , मनीषा व तिचे सर्व सहकारी हे जिल्हा खो-खो असो. व जिल्हा क्र ीडाधिकारी कार्यालय नाशिक यांच्या वतीने छत्रपती शिवाजी स्टेडियम येथिल खो-खो प्रशिक्षण केंद्रात नियमति सकाळ सायंकाळ अशा दोन सत्रात सराव करतात . त्यांना गीतांजली सावळे व उमेश आटवणे मार्गदर्शन करतात.(08स्पोर्ट्स निशा वैजल)

Web Title:  Nisha Vaishal holds gold in the National Kho-Kho Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.