शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथांच्या यात्रेची जय्यत तयारी, नियोजन सुरू : पालिका राबविणार ‘निर्मळवारी’ उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 14:04 IST

त्र्यंबकेश्वर: त्र्यंबकेश्वरला संत शिरोमणी श्रीनिवृत्तीनाथ महाराज यात्रेची पालिकेतर्फे जय्यत तयारी करण्यात येत असून त्यादृष्टीने नियोजन करण्यास सुरु वात केली आहे. येत्या ११ ते १३जानेवारी रोजी होणाºया यात्रेचा मुख्य दिवस पौष्टिक वैद्य एकादशी म्हणजेच १२ जानेवारी असा आहे.

त्र्यंबकेश्वर: त्र्यंबकेश्वरला संत शिरोमणी श्रीनिवृत्तीनाथ महाराज यात्रेची पालिकेतर्फे जय्यत तयारी करण्यात येत असून त्यादृष्टीने नियोजन करण्यास सुरु वात केली आहे. येत्या ११ ते १३जानेवारी रोजी होणाºया यात्रेचा मुख्य दिवस पौष्टिक वैद्य एकादशी म्हणजेच १२ जानेवारी असा आहे. अवघ्या महाराष्ट्रातील विविध संतांच्या दिंड्या भर थंडीची पर्वा न करता पायी पायी त्र्यंबकेश्वरकडे झेपावत आहेत. साधारणपणे पौष वैद्य दशमीला सर्व दिंड्या आपापल्या गडावर येऊन विसावतात. विशेष म्हणजे दर वर्षी यात्रेकरु ंची संख्या वाढत आहे.तशीच नवनवीन दिंड्यांची देखील भर पडत आहे. यात्रा कालावधीत वारकºयांना मार्गदर्शक सूचना फलकाद्वारे करु न तसेच स्वयंसेवक नेमुन कचरा, कचरापेटीत टाकावा. उघड्यावर शौचास न बसता शौचालयाचाच वापर करावा आदी सांगण्यात येणार आहे. त्यासाठी अनेक सेवाभावी संस्था या उपक्र मात स्वेच्छेने सहभागी झाल्या आहेत. तसेच सोशल मिडीयाचा देखील वापर करु न चित्रफिती दाखविल्या जात आहे. त्र्यंबक नगरपरिषदेच्या वतीने तयारी केली जात आहे. याशिवाय व्यावसायिक गाळे आखले जात आहेत. पोलीस यंत्रणा आरोग्य, वन, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी यात्रेत सहभाग असलेल्या यंत्रणांच्या प्रमुख अधिकाºयांच्या बैठका येत्या दोन ते तीन दिवसात जिल्हाधिकाºयांच्यावतीने विभागीय अधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली पालिका सभागृहात बोलावल्या जाणार आहेत.-------------------------पालिका देखील शासनाचे नवनवीन उपक्र म राबवित आहे. यावर्षीपासून पालिकेने ‘निर्मळवारी ’ हा उपक्र म राबविण्याचे ठरविलेले आहे. या उपक्र माचे स्वागत श्रीनिवृत्तीनाथ मंदिराच्या मंदीर जीर्णोद्धार भुमीपुजन सोहळा व भक्तनिवासाच्या उदघाटनाला मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आले असतांना त्यांना या वर्षीपासुन निर्मलवारी उपक्र माबाबत समजले असतांना त्यांनी आपल्या भाषणात या उपक्र माचे तोंड भरु न स्वागत केले. निर्मल वारी उपक्र मासाठी मुख्यमंत्री यांनी ८० लाख रु पयांचा भरघोस निधी त्र्यंबक नगरपरिषदेला जाहीर केला आहे. वारकºयांच्या मुक्कामाच्या, गर्दीच्या ठिंकाणी फिरती शौचालये, स्वयंसेवक यांना नियुक्त करून वारकºयांची अध्यात्मिक वारी निर्मळ व अधिक आरोग्यदायी केली जाणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक