निर्मला चौधरीला दुसरे सुवर्ण

By Admin | Updated: December 31, 2015 23:18 IST2015-12-31T22:55:13+5:302015-12-31T23:18:18+5:30

निर्मला चौधरीला दुसरे सुवर्ण

Nirmala Chaudhary second gold | निर्मला चौधरीला दुसरे सुवर्ण

निर्मला चौधरीला दुसरे सुवर्ण

पेठ : रांची (झारखंड) येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय खेलखूद क्रीडा स्पर्धेत पेठ तालुक्यातील नाचलोंढीच्या निर्मला चौधरीने दुस-या दिवशीही सुवर्णपदकाची कमाई केली असून, ४/१०० रिले स्पर्धेतही नाशिकच्या खेळाडूंनी कांस्यपदक मिळवले आहे. कविता राऊत हिने मिळविलेल्या यशाची यानिमित्त आठवण झाली. २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत निर्मलाने निर्विवाद यश संपादन केले. प्रशिक्षक भगवान भुरकूड यांच्या मार्गदर्शनाखाली नाचलोंडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील खेळाडूंनी झारखंडमध्ये विजय मिळविल्याने त्यांचे कौतुक होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Nirmala Chaudhary second gold