निर्मल वारीची जय्यत तयारी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 03:00 PM2020-01-13T15:00:33+5:302020-01-13T15:00:40+5:30

त्र्यंबकेश्वर : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रा अवघ्या पाच ते सहा दिवसांवर येउन ठेपली आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील यात्रेत निर्मल वारी अभियान राबविण्यात येणार असल्याने जय्यत तयारी नगरपरिषदेने सुरु केली आहे.

 Nirmal Vari's glorious preparations! | निर्मल वारीची जय्यत तयारी !

निर्मल वारीची जय्यत तयारी !

googlenewsNext

त्र्यंबकेश्वर : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रा अवघ्या पाच ते सहा दिवसांवर येउन ठेपली आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील यात्रेत निर्मल वारी अभियान राबविण्यात येणार असल्याने जय्यत तयारी नगरपरिषदेने सुरु केली आहे.
शहरात वर्षभरापासूनच प्लॅस्टीकबंदी केली असली तरी अजूनही गावात प्लॅस्टीकचा मुक्त संचार सुरु आहे. प्लॅस्टिकच्या रॅपरमध्ये विविध खाण्याच्या वापरण्याच्या वस्तु उदा. प्रसादी पुडे, प्रसादी वाण, कुरकुरे सारख्या लहान मुलांसाठी खाण्याचे पदार्थ वस्तु आदी हॉटेल्स स्वीटस्चे दुकान आदींमध्ये सर्रास प्लॅस्टीकचा वापर होत असतो. अशा प्लॅस्टीकवर बंदी कशी घालणार हा संशोधनाचा विषय आहे. तसेच यात्रा कालावधीत वारकरी भाविक यांच्यासाठी
नियोजित दिंड्यांची ठिकाणे, गावातील ठिकाणे , यात्रा परिसर, तमाशे परिसर आदी ठिकाणी ठेवण्यासाठी नगरपरिषदेने भाडे तत्वावर एकुण १२०० टॉयलेट बॉक्स घेतले आहे. सध्या हे सर्व सामान त्र्यंबकेश्वर शहरात दाखल झाले असुन सध्या फिटींग सुरु झाली आहे. साधारणत: २२जानेवारी पर्यंत हे टायलेट ठेवले जाणार आहेत. निर्मल वारी संकल्पनेत उघड्यावर टॉयलेटसाठी बसणे व परिसरात घाण करणे आदी बाबी पर्यावरणाला हानिकारक ठरते. यासाठी
साडे एकवीस लाख रु पये सारा प्लॅस्टला द्यावे लागणार आहे. निर्मल वारीचाच खर्च सुमारे ७० ते ८० लाख रु पये होणार आहे. त्यादृष्टीने स्थानिक नागरिकांनी देखील या निर्मल वारीला सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर, मुख्याधिकारी डॉ.प्रवीण निकम व अन्य पदाधिकाऱ्यांनी केले आहे. यात्रेत स्वच्छता केली जात असली तरी यात्रा पार पडल्यावर जो कचरा असतो तो साफ करण्यासाठी महिनाभर काम पुरते. यात्रा झाल्यानंतर विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी सेवाभावी संस्था महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती, डॉ.भरत केळकर यांचे सहकारी आदींचे देखील योगदान महत्वाचे असते.

Web Title:  Nirmal Vari's glorious preparations!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक