नाशिक : शहर व परिसरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत शाळा-महाविदयलयांचा परिसर असो किंवा महिलांच्या वर्दळीची अन्य ठिकाणे अशा सर्वच भागांवर सध्या ‘निर्भया’ लक्ष ठेवून आहे. निर्भयाशी अधिकाधिक महिला, युवतींनी जोडले जावे यासाठी शाळा-महाविदयलयांमध्ये पोहचवून पोलीस आयुक्तालयाच्या निर्भया पथकांकडून उपक्रम राबविला जात आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील महिला पोलिसांचे निर्भया पथक क्रमांक-३ने सिडको परिसरातील जनता विद्यालयाच्या शालेय मुलांच्या दिंडीत सहभाग घेतला. दिंडीच्या माध्यमातून परिसरात फेरफटका मारून महिलांसोबत पोलीस महिला कर्मचाऱ्यांनी संवाद साधत त्यांना माहितीपत्रके वाटप केली.
शाळेच्या दिंडीत ‘निर्भया’चा सहभाग; माहितीपत्रकांद्वारे जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 15:12 IST
नाशिक : शहर व परिसरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत शाळा-महाविदयलयांचा परिसर असो किंवा महिलांच्या वर्दळीची अन्य ठिकाणे अशा सर्वच ...
शाळेच्या दिंडीत ‘निर्भया’चा सहभाग; माहितीपत्रकांद्वारे जनजागृती
ठळक मुद्देपोलीस महिलांकडून ‘निर्भया’संकल्पना समजावून दिली जात होती. छुपा कॅमेरा टवाळखोरांचा प्रताप अचूक टिपतो