शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरानगरमध्ये गस्तीसाठी ‘निर्भय’ पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 00:57 IST

आगामी सण-उत्सव आणि निवडणुकीच्या काळात इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत कुठल्याही प्रकारची कायदासुव्यवस्था धोक्यात येणार नाही, याबाबत सर्व शांतता समिती सदस्यांनी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे.

इंदिरानगर : आगामी सण-उत्सव आणि निवडणुकीच्या काळात इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत कुठल्याही प्रकारची कायदासुव्यवस्था धोक्यात येणार नाही, याबाबत सर्व शांतता समिती सदस्यांनी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. कुठे काही अनुचित प्रकार किंवा संशयास्पद लोकांच्या हालचाली दिसून आल्यास जागरूक नागरिकाची भूमिका बजावून पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन उपआयुक्त अमोल तांबे यांनी केले आहे.पोलीस ठाणे हद्दीत सकाळ-संध्याकाळ पोलिसांचे निर्भय पथक गस्त घालणार असल्याचेही त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीची धामधूम तसेच विविध प्रकारचे सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथी साजरी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर इंदिरानगर पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी शाळा व महाविद्यालय सुटण्याच्या वेळी विद्यार्थिनींना टवाळखोरांचा त्रास सहन करावा लागतो, तसेच परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यावर काही तरुण मोटारसायकलची स्टंटबाजी करतात. किशोरनगर परिसरातील उद्यानामध्ये रात्रीच्या वेळी प्रेमीयुगुल अश्लील चाळे करत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी यावेळी बैठकीत केल्या. यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी विविध सूचना केल्या.यावेळी सहायक पोलीस आयुक्त ईश्वर वसावे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील उपस्थित होते. दरम्यान, नगरसेवक सतीश सोनवणे, अ‍ॅड. श्याम बडोदे, उपनिरीक्षक अंकुश धांडगे, जगदीश गावित, रामचंद्र जाधव माणिक मेमाने, शोभा सोनवणे आदींनी उपस्थित राहून परिसरातील विविध समस्यांकडे लक्ष वेधले.गुन्हेगारांवर वचकसाठी पथकाची गस्तपोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांना वचक निर्माण करण्यास सुरु वात केली आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत साध्या वेशात निर्भय पथक गस्त घालणार असून, टवाळखोरांवर कारवाई करण्यात येणार आहे. प्रत्येक नागरिक साध्या वेशातील पोलीस असून, त्यांच्या सहकार्यामुळे गुन्हेगारी कमी होण्यास मदत होणार होईल, असे अमोल तांबे म्हणाले.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका