ई पी एस पेन्शनधारकांचा निफाडला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 16:17 IST2018-11-14T16:15:40+5:302018-11-14T16:17:14+5:30

निफाड : भाजपा सरकारने सत्तेवर येण्याअगोदर ई पी एस पेन्शनधारकाना महिन्याला ३ हजार रु पये पेन्शन देऊ असे जाहीर केले होते, मात्र ४ वर्ष उलटूनही या सरकारने शब्द पाळला नाही असा आरोप पी एस पेन्शन धारक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर गुजराथी यांनी केला.

Niphadla Front of EPS Pensioners | ई पी एस पेन्शनधारकांचा निफाडला मोर्चा

ई पी एस पेन्शनधारकांच्या वतीने निफाडला काढण्यात आलेला मोर्चा.

ठळक मुद्दे नायब तहसीलदार पूनम दंडिले यांना निवेदन देण्यात आले.

निफाड : भाजपा सरकारने सत्तेवर येण्याअगोदर ई पी एस पेन्शनधारकाना महिन्याला ३ हजार रु पये पेन्शन देऊ असे जाहीर केले होते, मात्र ४ वर्ष उलटूनही या सरकारने शब्द पाळला नाही असा आरोप पी एस पेन्शन धारक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर गुजराथी यांनी केला.
निफाड येथे तहसील कार्यालयावर जिल्हा ई पी एस ९५ च्या पेन्शनर्स फेडरेशनच्या वतीने निफाड तहसिल कार्यालयावर मोर्चा काढला होता, त्या प्रसंगी ते बोलत होते. त्यानंतर नायब तहसीलदार पूनम दंडिले यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात ई पी एस ९५ अंतर्गत सेवानिवृत्त साखर कामगार, औद्योगिक कामगार, वीज कर्मचारी, एस टी कर्मचारी, विविध कार्यकारी सेवा सोसायटी, सह बँक आदी १८६ आस्थापनातील कामगारांची १९९५ पासून सुरू झालेल्या पेन्शन योजनेला २३ वर्ष पूर्ण होत आहे पण ती अजून लागू झाली नाही. सदर पेन्शन योजना लागू करावी, पेन्शनधारकाना अन्न सुरक्षा योजना लागू करावी पेन्शनधारकाना मोफत आरोग्य सेवा मिळावी आदी मागण्या आहेत.
यावेळी संघटनेचे सचिव डी. बी. जोशी, प्रकाश नाईक, नामदेव बोराडे, विनायक शिंदे, शेतकरी संघटनेचे सुधाकर मोगल आदींनी मनोगत व्यक्त केले.
या आंदोलनात तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे, शिवाजी शिंदे, लक्ष्मण काळे, शिवराम रसाळ, पंढरीनाथ कोल्हे, निवत्ती ताकाटे, भास्कर पवार, विष्णू जाधव, कारभारी भंडारे, फकिरा कर्डक, शिवाजी मोगल, राजमल चव्हाण, वसंत जाधव, वसंत थेटे, बळवंत जाधव, उत्तम रायते आदींसह वीज कर्मचारी, एच एल कर्मचारी, एस टी महामंडळ, औद्योगिक, सहकार क्षेत्रातील सेवानिवृत्त कर्मचारी सहभागी झाले होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांनीही मोर्चाला समारोप्रसंगी हजेरी लावीत संघटनेच्या मागणीला पाठिंबा दिला. यावेळी संघटनेच्या वतीनहीे नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

 

Web Title: Niphadla Front of EPS Pensioners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.