शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

निफाडला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 01:23 IST

शेतकऱ्यांच्या मुलांनी स्पर्धा परीक्षा देताना स्वत:वर विश्वास ठेवावा, जबाबदारी उचलण्याची हिंमत दाखवा, घराचा उंबरठा ओलांडण्याचे धाडस दाखवा, जिद्द बाळगा, आपल्या निर्णयावर ठाम राहा. कठोर मेहनत सुनियोजन करा, असे प्रतिपादन लोकसेवा आयोग स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करणारे आदित्यराजे पवार यांनी केले.

निफाड : शेतकऱ्यांच्या मुलांनी स्पर्धा परीक्षा देताना स्वत:वर विश्वास ठेवावा, जबाबदारी उचलण्याची हिंमत दाखवा, घराचा उंबरठा ओलांडण्याचे धाडस दाखवा, जिद्द बाळगा, आपल्या निर्णयावर ठाम राहा. कठोर मेहनत सुनियोजन करा, असे प्रतिपादन लोकसेवा आयोग स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करणारे आदित्यराजे पवार यांनी केले.निफाड येथील कर्मवीर गणपत दादा मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे मविप्र व बळीराजा फाउण्डेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून पवार बोलत होते.या शिबिराचे उदघाटन जि. प. सदस्य अमृता पवार यांनी केले. याप्रसंगी व्यासपीठावर बळीराजा फाउण्डेशनचे संस्थापक अध्यक्ष व स्पर्धा परीक्षा अभियानाचे निमंत्रक हंसराज वडघुले, गटविकास अधिकारी अभिजीत हजारे, प्राचार्य डॉ. आर.एन. भवरे माधव गिते , प्रभाकर वाघ, संपत डुंबरे,सुधाकर मोगल,नाना बच्छाव, डॉ. उत्तम डेर्ले, उपप्राचार्य ए. एल. गायकवाड, प्रा. सुनीता उफाडे, मंजूषा भंडारे , वैशाली गिते, प्रा. बी. सी .महाले ,साहेबराव मोरे, नितीन कोरडे, शिवराम रसाळ, सुभाषगायकवाड, योगेश वाघ, प्रा. आहेर, उपस्थित होते. अभियान समन्वयक कवि संदीप जगताप यांनी प्रास्ताविकातून या अभियानाची माहिती दिली.गटविकास अधिकारी अभिजित हजारे यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा असतो, त्याचे नियोजन कसे करावे या बद्दल मार्गदर्शन केले. रु पेश जाधव यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी न्यूनगंड न ठेवता पुढे यावे, असे ्र्रेआवाहन केले. याप्रसंगी जि. प. सदस्य अमृता पवार म्हणाल्या की, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ही कौतुकास्पद संकल्पना असून हे अभियान सातत्याने पुढे चालत राहावे तसेच यातून मोठ्या संख्येने अधिकारी घडावेत यासाठी संस्थेच्या पातळीवर तसेच वैयिक्तकरीत्या सर्वतोपरी मदत करण्यास मीकटिबद्ध असून, लवकरच तालुक्यातील इतर महाविद्यालयात हा उपक्र म राबवला जाईल असे सांगतविद्यार्थ्यांत ऊर्जा निर्माण होणे गरजेचे आहे, असे सांगितले.विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून त्या दिशेने सतत प्रयत्न करावा.टाकीचे घाव सोसल्या शिवाय देवपण येत नाही. त्या प्रमाणे सतत प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही असे सांगितले.याप्रसंगी बळीराजा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व स्पर्धा परीक्षा अभियानाचे निमंत्रक हंसराज वडघुले , गटविकास अधिकारी अभिजित हजारे , अमृता पवार , प्राचार्य डॉ. आर.एन.भवरे यांची भाषणे झालीकार्यक्र माचे सूत्रसंचालन प्रा.श्रीमती आर.एस.मोहोड यांनी केले.

टॅग्स :NashikनाशिकStudentविद्यार्थी