निफाडला शेतकरी संतप्त

By Admin | Updated: March 19, 2016 23:12 IST2016-03-19T22:59:59+5:302016-03-19T23:12:46+5:30

दुष्काळ निधी : लाभार्थी वंचित असल्याने गैरसोय

Niphadala farmers angry | निफाडला शेतकरी संतप्त

निफाडला शेतकरी संतप्त

 निफाड : नाशिक जिल्ह्यात सध्या दुष्काळाचे चटके मार्चमध्येच मोठ्या प्रमाणात बसण्यास सुरु वात झाली आहे. निफाडच्या पूर्व भागातील गावांना तर दुष्काळाचा सामना करताना शासनाच्या विविध घटकांतर्फे करण्यात येणारा छळही सहन करावा लागत आहे. तालुक्यातील वाकद, मानोरी, कानळद या गावातील शेतकर्यांचा दुष्काळनिधी अजूनही न आल्याने शेतकर्यांत संताप व्यक्त होत आहे.
निफाडच्या पूर्व भागातील वाकद, मानोरी या गावांचा दुष्काळिनधी शासनाने अजूनही बँकेत जमा न केल्याने शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. विशेष म्हणजे शेजारील शिरवाडे, देवगाव या गावांतील शेतकऱ्यांच्या बॅँक खात्यांवर दुष्काळनिधी जमा झाला आहे.
शेजारील गावांत निधी मिळतो, मात्र फक्त ४८ पैसे आणेवारी असलेल्या वाकद व मानोरी या गावांतील शेतकऱ्यांना दुष्काळनिधी मिळत नाही, याबाबत नाराजी पसरली आहे. याचबरोबर मागील वर्षी फळबागा वाचिवण्यासाठी शासनाने विशेष तरतूद करून फळबाग पुनरुज्जीवन योजना आखली होती. त्या योजनेबाबतही शेतकऱ्यांनी अनेकवेळेस मागणी करूनही काहीही कार्यवाही होत नाही. वाकद व मानोरी या गावात सध्या पाण्याचा भयानक दुष्काळ असून १९७२ च्या दुष्काळापेक्षाही या वर्षीचे चटके भयानक आहेत, असे अनेक वयोवृद्ध सांगतात. वाकद येथील ऊस, कांदा जळून गेला आहे. द्राक्षबागा पाण्याअभावी तोडण्याची वेळ आलेली आहे. लवकरात लवकर फळबाग पुनरुज्जीवन योजना राबवावी, दुष्काळनिधी त्वरित जमा करावा अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांकडे संजय खैरनार, शिवाजी बडवर, दिलीप लिप्टे, साहेबराव गायकवाड, अण्णा माळी, सुनील गायकवाड, रामराव गायकवाड यांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Niphadala farmers angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.