निफाड तालुकास्तरीय कबड्डीत बजरंग स्पोर्ट क्लब विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 17:53 IST2018-09-17T17:51:25+5:302018-09-17T17:53:21+5:30
निफाड तालुका स्पोर्ट क्लबच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत बजरंग स्पोर्ट क्लब शिंगवे संघाने विजय संपादन केला.

निफाड तालुकास्तरीय कबड्डीत बजरंग स्पोर्ट क्लब विजयी
खेड्यातील तरु णांना मैदानी खेळ खेळण्यास प्रेरणा मिळावी या हेतूने तालुका स्तरावर कबड्डीचे सामने आयोजित करण्यात आले होते. ग्रामीण भागात क्रि केट प्रमाणेच कबड्डीचे सामने व्हावेत, मैदानी खेळ नावारूपाला यावेत यासाठी पिंपळगाव बाजार समितीचे संचालक गोकुळ गीते यांनी तालुक्यात प्रथमच कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते . प्रथम विजयी संघाला ११ हजार, द्वितीय संघास ७ हजार तर तृतीय संघास ५ हजार रु पयांचे पारितोषिक देण्यात आले. प्रथम जय बजरंग स्पोर्ट क्लब शिंगवे, द्वितीय क्रीडा प्रबोधनी निफाड तर तृतीय क्रमांक वीरभद्र बॉईज करंजगाव संघाने पटकावला. बक्षीस वितरण कार्यक्र मास गोकुळ गीते, नितीन शिंदे, रामेश्वर संप, शुभम रायते, रु पेश जाधव, अप्पा वाबळे, बापू रायते, अक्षय शिंदे, गणेश भागवत योगेश हाडपे यासह खेळाडू व नागरिक उपस्थित होते.