शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

निफाड तालुक्यात कोरोना रुग्णांसाठी "ते" ठरताहेत आरोग्यदूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 18:11 IST

सायखेडा : निफाड तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरू असून खेड्यातील रुग्णांची वाढती संख्या प्रशासनाची चिंता वाढवत आहे. अपुरे मनुष्यबळ, बेडची कमतरता, जागेचा अभाव, अपुरी यंत्रसामुग्री यामुळे अनेक रुग्णांना आपला प्राण गमवावा लागत आहे. अशा कठीण काळात गोदाकाठ भागातील डॉ. प्रल्हाद डेर्ले हे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी आरोग्यदूत ठरत आहेत.

ठळक मुद्देवर्षभरात एकही दिवस सुट्टी न घेणारा अवलिया : दररोज १०० रुग्णांवर उपचार

सायखेडा : निफाड तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरू असून खेड्यातील रुग्णांची वाढती संख्या प्रशासनाची चिंता वाढवत आहे. अपुरे मनुष्यबळ, बेडची कमतरता, जागेचा अभाव, अपुरी यंत्रसामुग्री यामुळे अनेक रुग्णांना आपला प्राण गमवावा लागत आहे. अशा कठीण काळात गोदाकाठ भागातील डॉ. प्रल्हाद डेर्ले हे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी आरोग्यदूत ठरत आहेत.चांदोरी येथे डॉ. डेर्ले हे दिवसभरात किमान १०० कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करीत आहेत. स्कोर कमी असलेल्या रुग्णाला घरीच टेलिमेडिसिन देऊन उपचार करण्यासाठी पाठवून देतात. मात्र, घरी गेल्यानंतर होम क्वारंटाईन व्हावे, किमान वीस दिवस कोणाच्या संपर्कात येऊ नये, असा नियम ते घालून देतात. उपचार करत असताना रुग्णामध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी रुग्णाला जास्तीत जास्त वेळ देऊन त्यांच्याशी संवाद साधतात. एकदा कोरोना रोगाची भीती मनातून गेली की रुग्ण अर्धे बरे होतात. चांगला आहार, जास्त फळे खाणे, जास्त पाणी पिणे, कोरोना संदर्भात बातम्या न पहाणे, मोबाईलपासून दूर रहाणे, वेळेवर दिलेली औषधे घेणे असा मार्मिक सल्ला देऊन रुग्णाला सकारात्मक ऊर्जा देतात.जिल्ह्यात कुठेही फिरले तरी सहजासहजी बेड मिळत नाही. व्हेंटिलेटर हवे असलेल्या बेडसाठी नातलगांना मोठी धावपळ करावी लागत आहे. बेड मिळाले नाही किंवा ऑक्सिजन मिळाला नाही यामुळे अनेक रुग्ण जगाचा कायमचा निरोप घेत आहेत. अशा प्रसंगात डॉ. डेर्ले निफाड तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांना मेडिसिन देऊन ठणठणीत बरे करीत असल्याने ते प्रसंगात देवदूत ठरत आहेकोरोनाची दुसरी लाट ही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. आज एका एका गावात सुप्त पॉझिटिव्ह रुग्ण संख्या भरपूर आहे. अशा काळात आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे. शेवटी मर्यादा येतात. मात्र स्कोर कमी असलेल्या रुग्णांना टेलिमेडिसिन देऊन घरीच उपचार करीत आहे. मात्, या काळात योग्य ती खबरदारी घ्यावी यासह उत्तम आहार, योग्य व्यायाम, वेळेवर औषध घेण्यासाठी सूचना देऊन रुग्णामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचे काम सुरू आहे. वेळेत उपचार आणि न घाबरणारे रुग्ण थोड्या दिवसांत ठणठणीत बरे होतात.- डॉ प्रल्हाद डेर्ले, चांदोरी 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSocialसामाजिक