निफाडला स्वातंत्र्यदिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:19 IST2021-08-19T04:19:05+5:302021-08-19T04:19:05+5:30
निफाड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित कॉंग्रेस भवन येथे मधुसूदन आव्हाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी दिवंगत स्वातंत्र्य ...

निफाडला स्वातंत्र्यदिन साजरा
निफाड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित कॉंग्रेस भवन येथे मधुसूदन आव्हाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी दिवंगत स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबातील सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यात मधुकर कोष्टी, मधुकर राऊत, मधुसूदन आव्हाड यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी निफाड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मधुकर शेलार, विनायक शिंदे, पुंजाअप्पा तासकर, संपत कराड, सचिन खडताळे, सुहास सुरळीकर, प्रवीण तनपुरे, राजेश लोखंडे, नंदकुमार कापसे, शकील शेख आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सरस्वती विद्यालय
सरस्वती विद्यालय येथे निफाड इंग्लिश स्कूल कमिटीचे चेअरमन नंदलाल चोरडिया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी सरस्वती विद्यालय स्कूल कमिटीचे अध्यक्ष प्रवीण कराड, मुख्याध्यापिका ज्योती भागवत यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
लक्ष्मी नागरी पतसंस्था
श्री लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था येथे अध्यक्ष अभिजित चोरडिया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी पतसंस्थेचे उपाध्यक्ष प्रवीण कराड आदींसह संचालक उपस्थित होते श्री शांतीलालजी सोनी निफाड नागरी सहकारी पतसंस्था येथे पतसंस्थेचे अध्यक्ष शशांक सोनी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात करण्यात आले याप्रसंगी पतसंस्थेचे उपाध्यक्ष मधुकर राऊत ,संचालक मंडळ व मॅनेजर रामनाथ सानप आदी उपस्थित होते कर्मवीर गणपतदादा मोरे महाविद्यालयात प्राचार्य आर. एन. भवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात करण्यात आले. निफाड अर्बन बँकेत स्वीकृत संचालक संपत डुंबरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष रामदास व्यवहारे ,उपाध्यक्ष संजय पोफळीया ज्येष्ठ संचालक नंदलाल बाफना, राजेंद्र राठी ,विजय बोरा आदीसह मॅनेजर मोहन सुराणा व कर्मचारी उपस्थित होते.
निफाड वि.का. सोसायटी
निफाड विविध कार्यकारी सोसायटी येथे सोसायटीचे उपाध्यक्ष बापूसाहेब कुंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रमेश जाधव , सचिव विठ्ठल कोटकर यांच्यासह सोसायटीचे संचालक उपस्थित होते निफाड तालुका सहाय्यक निबंधक कार्यालय व निफाड तालुका देखरेख संघ येथे तालुक्याचेसहकार अधिकारी राजेश ढवळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. निफाड बसस्थानक येथे मधुकर कोष्टी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी वाहतूक नियंत्रक ए. एस.मन्सुरी,एस. एस.गवळी, व्ही. सी चौधरी आदी उपस्थित होते निफाड इंग्लिश स्कूल येथे निफाड इंग्लिश स्कूल कमिटीचे अध्यक्ष नंदलाल चोरडिया यांच्या यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी मुख्याध्यापक. एस.के.महाजन , पर्यवेक्षक पुंड आदींसह शिक्षक ,विद्यार्थी उपस्थित होते
निफाड मार्केट यार्ड
निफाड मार्केट यार्ड येथे लासलगाव कृउबाचे संचालक सुभाष कराड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले म्हाळसाकोरे येथील ज्ञानदीप इंग्लिश मिडीयम स्कूल येथे संस्थेचे समनव्यक नूर शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी नांदूरमध्यमेश्वर येथे एका अपघातात गोदावरी नदीपात्रात पडलेल्या एक वाहनातील 15 जणांचा जीव वाचवणाऱ्या लहानु मोरे,व भाऊसाहेब गोधडे यांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला याप्रसंगी पालक प्रतिनिधी प्रकाश मंडलिक, कैलास रत्ने, विठ्ठल मुरकुटे, किरण महाले, ,मुख्याध्यापक सौ शर्मिला शेख आदींसह शिक्षक ,विद्यार्थी उपस्थित होते
फोटो - १८ निफाड इंडिपेन्डन्स
निफाड नगरपंचायत येथे नगरपंचायतीच्या प्रशासक तथा निफाडच्या प्रांत डॉ अर्चना पठारे या ध्वजारोहण करतांना सोबत मुख्याधिकारी डॉ श्रीया देवचके ,