नववीच्या विद्यार्थ्याचा आत्महत्त्येचा प्रयत्न

By Admin | Updated: April 21, 2016 00:47 IST2016-04-20T23:55:31+5:302016-04-21T00:47:49+5:30

नववीच्या विद्यार्थ्याचा आत्महत्त्येचा प्रयत्न

Ninth student suicide attempt | नववीच्या विद्यार्थ्याचा आत्महत्त्येचा प्रयत्न

नववीच्या विद्यार्थ्याचा आत्महत्त्येचा प्रयत्न

 लोहोणेर : शाळेतील साहित्य
घेण्यासाठी शेतमजूर वडिलांकडे पैसे नसल्याने देवळा तालुक्यातील विठेवाडी (लो.) येथील नववीच्या विद्यार्थ्याने विषारी औषध
सेवन करून आत्महत्त्येचा प्रयत्न केला असून, सध्या तो मालेगाव येथे खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.
विठेवाडी येथील सोनवणे वस्तीवर नारायण पंडित सोनवणे हे कुटुंबीयांसह वडिलोपार्जित मिळालेल्या शेतात राहतात.
अवघी एक एकर कोरड जमीन असल्यामुळे ते पत्नीसह रोजंदारीचे काम करून उदरनिर्वाह करीत
आहेत. बिकट परिस्थितीत तीन मुलींचे विवाह पार पाडले तर सर्वात लहान एकुलता मुलगा पुष्कर हा विठेवाडी (ता.देवळा) येथील माध्यमिक शाळेत नववीत शिक्षण घेत आहे. दि. ५ एप्रिल रोजी सोनवणे व त्यांची पत्नी नेहमीप्रमाणे दुसऱ्याच्या शेतात कामास गेले असता पुष्कर शाळेतून घरी आला व त्यानंतर त्याचे वडील ज्या शेतात कामास गेले होते तेथे जाऊन मला शाळेत साहित्य घेण्यासाठी उद्या शंभर रु पये लागत आहेत. मला पैसे द्या नाही तर शाळेत बसू देणार नाहीत,
असे वडिलांना सांगून घरी निघून गेला. (वार्ताहर)

Web Title: Ninth student suicide attempt