नऊ संशयितांना चार दिवसांची कोठडी
By Admin | Updated: August 19, 2016 00:46 IST2016-08-19T00:46:50+5:302016-08-19T00:46:58+5:30
नऊ संशयितांना चार दिवसांची कोठडी

नऊ संशयितांना चार दिवसांची कोठडी
नाशिकरोड : देवळालीगाव रोकडोबावाडी वालदेवी पुलालगत झालेल्या दुहेरी हत्त्याकांडातील नऊ संशयितांना गुरुवारी नाशिकरोड न्यायालयासमोर उभे केले असता चार दिवस पोलीस कोठडी देण्यात आली.
रोकडोबावाडी येथे ७ आॅगस्ट रोजी मध्यरात्री झालेल्या हल्ल्यात गुलाब करीम शेख, अकबर ऊर्फ गुड्डू अन्वर शेख या दोघा युवकांचा मृत्यू झाला होता. तर तिसरा युवक संदीप रघुनाथ जैन हा गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी आतिष कैलास निकम, नितीन निवृत्ती बनकर, आकाश नामदेव खताळे, अमोल अंबादास पठाडे, गोविंदा शंकर इंगोले, प्रशांत नाना जाधव, विशाल चंद्रकांत पगारे या सात जणांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर तपासामध्ये अमजद इब्राहिम शेख व आझाद नजीर शेख या दोघांनादेखील याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.