शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

नऊ महिन्यांच्या बालकाचा डेंग्यूने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 00:54 IST

शहरातील गावठाण परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुने नाशिकमधील कथडा भागात एका  कुटुंबातील नऊ महिन्यांच्या बालकाचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे.

नाशिक : शहरातील गावठाण परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुने नाशिकमधील कथडा भागात एका  कुटुंबातील नऊ महिन्यांच्या बालकाचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे.  शहर व परिसरात डेंग्यू, चिकुनगुण्या यांसारख्या आजारांचा फैलाव ‘एडिस’ जातीच्या डासांपासून होत असून, दुसरीकडे विषाणूजन्य आजारांनीही डोके वर काढल्याने नागरिक हैराण झाले आहेत; मात्र महापालिकेचा आरोग्य विभाग अद्यापही सुस्त आहे. विषाणूजन्य आजारांसह डेंग्यू, चिकुनगुण्यासारख्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यास आरोग्य विभाग, शहरी आरोग्य विभाग व हिवताप नियंत्रण विभाग पूर्णत: अपयशी ठरले आहे. सध्या  महापालिकेमधील प्रशासकीय कारभारासह लोकप्रतिनिधींचा कारभारही थंडावला आहे. लोकप्रतिनिधींचा अधिकाºयांवर वचक न राहिल्याने प्रशासनाकडून शहरात मूलभूत सोयी-सुविधांची कामे करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. डेंग्यू, चिकुनगुण्या यांसारख्या आजारांनी थैमान घातले असतानाही प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेऊन निद्रिस्त झाल्याचे दिसून येत आहे.  जुने नाशिकमधील कथडा परिसरात या आजारांनी नागरिक त्रस्त झाले असून, याच भागात राहणारे रिक्षाचालक नवाज शेख यांचा एकुलता एक मुलगा अशरफ अवघ्या नऊ महिन्यांचा असतानाच डेंग्यूच्या डासाने दंश केल्याने त्याची प्रकृती खालावली. रोगप्रतिकारक शक्तीचा विकास न झाल्याने बालकाचा डेंग्यूशी लढा अपयशी ठरला. शुक्रवारी उपचारादरम्यान या चिमुकल्याची प्राणज्योत मालवली. कथडा भागातील सुमारे दहा ते पंधरा कुटुंबांमध्ये डेंग्यूसदृश आजाराची लागण झालेले रुग्ण औषधोपचार घेत आहेत.या भागात डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती ठिकाणे तत्काळ शोधून डासांच्या अळ्या, अंडी वगैरे नष्ट करण्यावर भर देण्याची गरज आहे. कथडा परिसरापासून महापालिकेचे डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय अगदी जवळ जरी असले तरी या रुग्णालयात दर्जेदार गुणवत्तापूर्ण औषधोपचार रुग्णाला मिळेलच याची शाश्वती नाही. त्यामुळे नागरिक शक्यतो या रुग्णालयात जाणे टाळतात.नागरिक हैराणशहर व परिसरात डेंग्यू, चिकुनगुण्या यांसारख्या आजारांचा फैलाव ‘एडिस’ जातीच्या डासांपासून होत असून, दुसरीकडे विषाणूजन्य आजारांनीही डोके वर काढल्याने नागरिक हैराण झाले आहेत.लोकप्रतिनिधींचा अधिकाºयांवर वचक न राहिल्याने प्रशासनाकडून शहरात मूलभूत सोयी-सुविधांची कामे करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

टॅग्स :dengueडेंग्यूDeathमृत्यूNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका