नऊ लाखांचा ऐवज लंपास

By Admin | Updated: February 17, 2016 23:02 IST2016-02-17T22:58:26+5:302016-02-17T23:02:21+5:30

नऊ लाखांचा ऐवज लंपास

Nine million rupees lump | नऊ लाखांचा ऐवज लंपास

नऊ लाखांचा ऐवज लंपास


नाशिकरोड : एकलहरारोड भोर मळा येथे रविवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या घरफोडीमध्ये एकूण पावणेनऊ लाखांचा ऐवज चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले आहे. भोर मळा येथे राहणारे गोरख जयराम भोर यांचे एकत्रित कुटुंब असून, रविवारी मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्याने घराच्या पाठीमागील लोखंडी ग्रीलची खिडकी उघडून घरात प्रवेश केला. रात्री चोरट्यांनी स्टोअर रूम, देवघराच्या कपाटातील सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेली होती. या प्रकरणी प्रथम ४७ हजार रुपयांची रोकड व सोन्याचे दागिने असा एकूण एक लाख ७७ रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे फिर्यादीत म्हटले होते. मात्र फिर्यादींच्या कबुलीजबाबामध्ये घरातील सुमारे ४२ तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे उघडकीस आले आहे.
ब्रेसलेट, सोन्याच्या साखळ्या, पोत, हार, कर्णफुले, नथ, पोहेहार, झुबे, अंगठ्या, बदाम पान असे एकूण ४२ तोळे वजनाचे दागिने व ४७ हजार रुपयांची रोकड असा एकूण ८ लाख ६१ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली असून, तपासाची चक्रे फिरवली आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Nine million rupees lump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.