पंचवटी विभागात नऊ इच्छुकांचे अर्ज दाखल

By Admin | Updated: February 2, 2017 01:18 IST2017-02-02T01:18:40+5:302017-02-02T01:18:53+5:30

मनपा निवडणूक : अर्ज सादर करणाऱ्यांत महिलांची आघाडी

Nine interested candidates filed their application in Panchavati division | पंचवटी विभागात नऊ इच्छुकांचे अर्ज दाखल

पंचवटी विभागात नऊ इच्छुकांचे अर्ज दाखल

पंचवटी : महापालिका पंचवार्षिक निवडणुकीसाठी पंचवटी विभागातील सहा प्रभागातून बुधवारी नऊ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी बुधवारी इच्छुकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तविली जात होती, मात्र नवख्या इच्छुकांशिवाय विद्यमान लोकप्रतिनिधी फिरकलेच नसल्याचे चित्र पंचवटी विभागीय कार्यालयात दिसून आले.
पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक १, २, ३ व ६ या प्रभागातील नऊ इच्छुकांनी बुधवारी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केले आहेत. या नऊ इच्छुकांपैकी सहा महिला तर तीन पुरुषांचा समावेश आहे. माजी लोकप्रतिनिधीत मनसेचे अनंता सूर्यवंशी यांनी पुन्हा अपक्ष उमेदवारी अर्ज सादर केला आहे. प्रभाग क्रमांक १ अ मधून रोहिणी जाधव, पूनम धनगर यांनी अपक्ष तर प्रभाग २ अ मधून सुनीता खरे मनसे, क मधून अनंता सूर्यवंशी अपक्ष, प्रभाग २ ड मधून सुवर्णा संधान मनसे, रेखा तांबे शिवसेना, प्रभाग क्रमांक ३ क मधून रोहिणी अहिरे अपक्ष, ३ ड मधून किरण दराडे तर प्रभाग क्रमांक ६ ड मधून महेश सोनार अशा नऊ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. बुधवारी इच्छुकांनी विभागीय कार्यालयातील कक्षात धाव घेत उमेदवारी अर्ज बरोबर भरलेला आहे की नाही तसेच काही कागदपत्रे अपूर्ण आहेत का याची तपासणी करण्यासाठी गर्दी केली होती. (वार्ताहर)

Web Title: Nine interested candidates filed their application in Panchavati division