लोकमत न्यूज नेटवर्कचांदवड : तालुक्यातील खडकजांब शिवारात मुंबई - आग्रारोडवर बुधवारी (दि. १७) रात्री ९ वाजेच्या सुमारास मुंबईकडून मालेगावकडे येणारी स्विफ्ट कार पलटी होऊन झालेल्या अपघातात नऊ जण जखमी झाले. या सर्वांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर प्रथमोपचार करूा त्यांना तातडीने मालेगाव येथे अधिक उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास स्विफ्ट डिझायर (क्र. एमएचएक्स ६८०८) मुंबईकडून मालेगावकडे जात असताना खडकजांब शिवारात रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. त्यात शिबा शेख (२०), शोएब शेख (१२), शौकत अली सय्यद (३५), तारीक शेख (०५), जैनबोद्दीन असयोद्दीज शेख (६२), आयेशा चांद शेख (१३), सलाउद्दीन जमीनुद्दीन शेख (१०), समीया शेख (१३), रजो शेख (१८) सर्व रा. कमालपुरा (मालेगाव) आदी जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच सोमा कंपनीच्या टोल कर्मचारी, परिसरातील नागरिकांनी जखमींना उपजिल्हा रुग्णालयात आणले. त्यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना मालेगाव येथे पाठविण्यात आले. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आर. एस. आवारे यांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.
खडकजांब शिवारात कार उलटून नऊ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 00:26 IST
चांदवड : तालुक्यातील खडकजांब शिवारात मुंबई - आग्रारोडवर बुधवारी (दि. १७) रात्री ९ वाजेच्या सुमारास मुंबईकडून मालेगावकडे येणारी स्विफ्ट कार पलटी होऊन झालेल्या अपघातात नऊ जण जखमी झाले. या सर्वांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर प्रथमोपचार करूा त्यांना तातडीने मालेगाव येथे अधिक उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
खडकजांब शिवारात कार उलटून नऊ जखमी
ठळक मुद्देसर्वांची प्रकृती गंभीर असून, त्यांना तातडीने मालेगाव येथे उपचारासाठी पाठविण्यात आले