नामपूरला जनावरे चोरणाऱ्यास अटक

By Admin | Updated: September 1, 2016 23:55 IST2016-09-01T23:54:33+5:302016-09-01T23:55:25+5:30

नामपूरला जनावरे चोरणाऱ्यास अटक

Nimpur cattle robber arrested | नामपूरला जनावरे चोरणाऱ्यास अटक

नामपूरला जनावरे चोरणाऱ्यास अटक


नामपूर : नामपूरसह परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून सुमारे २० ते २५ गायी, गोऱ्हे, बैल तसेच ग्रामीण भागातील शेळ्या मोठ्या प्रमाणात चोरीस जात आहेत. याबाबत गावातील सामाजिक कार्यकर्ते दगाजी बच्छाव यांनी पशुपालकांना न्याय मिळावा म्हणून वारंवार अर्ज, तक्रारी केल्या आहेत.
अखेर नामपूर बाजारात गुरे खरेदी करणाऱ्या वारीस पठाण या इसमाची संशयावरून पोलीस उपनिरीक्षक श्रीराम कोळी, राजेन्द्र होळकर, पोलीसपाटील बाजीराव सावंत यांनी कसून चौकशी केल्यावर पठाण याने कबुली दिल्यामुळे त्याला तत्काळ अटक करून जायखेडा येथे दोन दिवसाची कस्टडी देण्यात आली असून, काल रात्री पुन्हा गावातील बाबुलाल शर्मा यांची दुभती गाय चोरीला गेली आहे .यामुळे पशुपालकांत मोठ्या प्रमाणात चिंता निर्माण झाली आहे. नामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन पुढील तपास सुरू आहे. (वार्ताहर)

Web Title: Nimpur cattle robber arrested