निमगावी ७६.५९ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:18 IST2021-01-16T04:18:49+5:302021-01-16T04:18:49+5:30

निमगाव ग्रामपंचायत कायम संवेदनशील असल्याने पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, उपअधीक्षक शशिकांत शिंदे, पोलीस निरीक्षक प्रवीण वाडीले,उपनिरीक्षक महेबूब सय्यद, ...

Nimgavi 76.59 per cent turnout | निमगावी ७६.५९ टक्के मतदान

निमगावी ७६.५९ टक्के मतदान

निमगाव ग्रामपंचायत कायम संवेदनशील असल्याने पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, उपअधीक्षक शशिकांत शिंदे, पोलीस निरीक्षक प्रवीण वाडीले,उपनिरीक्षक महेबूब सय्यद, गोरख गर्दे व पोलीस कर्मचारी दिवसभर तळ ठोकून होते. निवडणूक निर्णय अधिकारी योगेश पाटील, सहायक डी.एन. देशमुख, आशा वर्कर होते, जे. डी हिरे, मधुकर हिरे, दीपक अहिरे, मंगेश हिरे यांनी दिवसभर मेहनत घेतली. कुठेही अनुचित प्रकार न घडता शांततेत मतदान झाले.

निमगाव ग्रामपंचायत वार्ड निहाय मतदान

वाॅर्ड क्र. १ मध्ये १४३१ पैकी १००३, वाॅर्ड क्र. २ मध्ये १०२५ पैकी ८६८, वाॅर्ड क्र. ३ मध्ये ९७१ पैकी ६९६,

वाॅर्ड क्र. ४ मध्ये १२२५ पैकी ९६८, वाॅर्ड क्र. ५ मध्ये १२७५ पैकी १०३७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

Web Title: Nimgavi 76.59 per cent turnout