निमा अध्यक्षपदाच्या उमेदवाराचा शोध सुरू
By Admin | Updated: July 28, 2016 01:15 IST2016-07-28T01:15:09+5:302016-07-28T01:15:39+5:30
कार्यकारिणीच्या संमतीनंतर होणार निवड

निमा अध्यक्षपदाच्या उमेदवाराचा शोध सुरू
सातपूर : निमाची द्वैवार्षिक निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर आता रिक्त असलेल्या अध्यक्षपदासाठी सक्षम उमेदवाराची शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी एका मोठ्या उद्योगातील बड्या अधिकाऱ्यास गळ घालण्यात येत असल्याचे समजते. नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या बैठकीत अध्यक्ष निवडला जाणार आहे.
निमा निवडणुकीत पहिल्या वर्षीचे अध्यक्षपद हे मोठ्या उद्योगाच्या प्रतिनिधीसाठी राखीव असते, तर दुसऱ्या वर्षी लघु उद्योगातील उपाध्यक्षाला अध्यक्षपदाची संधी आपोआप मिळते. मोठ्या उद्योगातील प्रतिनिधी निवडणुकीच्या फंदात पडत नाहीत आणि निमा सभासददेखील त्यांना निवडणुकीचा आग्रह धरत नाहीत; मात्र
रिक्त पदावर पहिल्या कार्यकारिणीच्या बैठकीत अध्यक्षपदाच्या उमेदवारावर शिक्कामोर्तब केले जाते.
दरम्यान निवडणूक बिनविरोध झाली असली तरी अजून सर्वसाधारण सभा बाकी आहे. ३१ जुलैला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत पदग्रहण सोहळा होईल. त्यानंतरच्या कार्यकारिणीच्या बैठकीत अध्यक्षपदाचा विचार केला जाणार असल्याची माहिती निमा सूत्रांनी दिली आहे. (वार्ताहर)